लसीकरणाच्या बोगस प्रमाणापत्रांचा सुळसुळाट! आरोग्य विभागावर 'वॉच'

लसीकरणाच्या बोगस प्रमाणापत्रांचा सुळसुळाट! आरोग्य विभागावर 'वॉच'
लसीकरणाच्या बोगस प्रमाणापत्रांचा सुळसुळाट! आरोग्य विभागावर 'वॉच'
लसीकरणाच्या बोगस प्रमाणापत्रांचा सुळसुळाट! आरोग्य विभागावर 'वॉच'esakal
Updated on
Summary

नवीन ओमिक्राम व्हेरिएंटपासून संरक्षण करण्यासाठी गेल्या आठवडाभरापासून लसीकरण केंद्रांवर गर्दी वाढली आहे.

सोलापूर : महापालिका आरोग्य विभागाकडून कोरोनाचा (Covid-19) प्रसार थांबविण्यासाठी एकीकडे लसीकरण (Covid Vaccination) मोहीम गतिमान करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे त्याच विभागातील कर्मचाऱ्यांकडून पैसे घेऊन दोन डोस पूर्ण झाल्याचे बोगस प्रमाणपत्र देण्याचा सुळसुळाट सुरू असल्याची चर्चा आहे. याबाबत उपायुक्‍त धनराज पांडे (Dhanraj Pande) यांनी तत्काळ दखल घेत बोगसगिरी आढळून आल्यास संबंधित कर्मचाऱ्यासह नागरिकांवर गुन्हा (Crime) दाखल करण्याचा आदेश आरोग्य विभागाला दिला आहे.

लसीकरणाच्या बोगस प्रमाणापत्रांचा सुळसुळाट! आरोग्य विभागावर 'वॉच'
ओमिक्रॉन टेस्टिंगची राज्यात यंत्रणाच नाही!

कोरोनाच्या ओमिक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरिएंटची भीती नागरिकांमध्ये पसरली आहे. यापासून संरक्षण करण्यासाठी गेल्या आठवडाभरापासून लसीकरण केंद्रांवर गर्दी वाढली आहे. नुकताच शासनाने नवीन आदेश काढून पुन्हा सार्वजनिक ठिकाणी कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. या सूचनांची अंमलबजावणी महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. दोन डोस घेतलेल्या नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी फिरण्याची मुभा दिली आहे. शासकीय कार्यालये, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, आस्थापने, व्यापारी संकुल आदी ठिकाणी दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाच प्रवेश दिला जात आहे.

लसीकरणाच्या बोगस प्रमाणापत्रांचा सुळसुळाट! आरोग्य विभागावर 'वॉच'
बार्शीत माजी नगरसेवकाच्या घरावर गोळीबार! दोघांना अटक

लसीचे डोस न घेतलेल्या नागरिकांवर अथवा व्यापाऱ्यांवर पाचशे रुपये ते पन्नास हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाईचे कडक निर्बंध लादले आहेत. या नव्या आदेशामुळे लस न घेताच नुसतेच डोस पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र घेण्याचे प्रमाण वाढत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे करण्यात आल्या आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी दोन डोस घेण्यासाकरिता महापालिका प्रशासन एकीकडे विविध मोहिमा राबवीत आहे. तर, त्याच प्रशासनातील काही कर्मचारी पैसे घेऊन दोन डोस पूर्ण झाल्याचे बोगस प्रमाणपत्र वाटप करत असल्याची तोंडी तक्रार उपायुक्‍तांना प्राप्त झाली. या तक्रारीची त्वरित दखल घेत आरोग्य विभागप्रमुखांना तक्रारीत तथ्य आढळल्यास कर्मचाऱ्यासह संबंधित व्यक्‍तीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. आता या विभागातील कामकाजावर उपायुक्‍त पांडे हे करडी नजर ठेवून आहेत.

बातमीदार : प्रमिला चोरगी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur-pune highway
solapur
solapur issues of voters
farmer loan waiver scheme issue
Marathi News Esakal
www.esakal.com