esakal | मोठी बातमी ! मध्य प्रदेशातील कॉंग्रेस आमदारांच्या देशभरातील कंपन्यांवर छापा; आयकरला सापडले मोठे घबाड
sakal

बोलून बातमी शोधा

nilay daga mla congress

रोकड मोठी असल्याने सुट्टीतही बॅंका सुरु ठेवल्या
मध्य प्रदेशातील कॉंग्रेसचे आमदार नीलय डागा यांच्या महाराष्ट्रातील सोलापूर येथील घरावर केंद्रीय प्राप्तीकर विभागाने छापा टाकला. देशभरात गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशसह अन्य राज्यांमध्ये त्यांच्या सुमारे 20 ऑईल मिल (खाद्यतेल) कंपन्या आहेत. करभरणा टाळण्यासाठी त्यांनी ऑनलाइन नव्हे तर ऑफलाइन (रोखीने) व्यवहार केल्याबद्दल त्यांच्या कंपन्यांवर एकाचवेळी छापा टाकण्यात आला. सोलापुरातील त्यांच्या घरातून तब्बल साडेसात कोटींची रोकड जप्त करण्यात आली असून देशभरातील हा व्यवहार शेकडो कोटींपर्यंत असण्याची शक्‍यता प्राप्तीकर विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वर्तविली.

मोठी बातमी ! मध्य प्रदेशातील कॉंग्रेस आमदारांच्या देशभरातील कंपन्यांवर छापा; आयकरला सापडले मोठे घबाड

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : कॉंग्रेसचे मध्य प्रदेशातील आमदार नीलय डागा यांची महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात चिंचोली एमआयडीसीत ऑईल मिल आहे. प्राप्तीकर विभागाचे उपसंचालक व त्यांच्या पथकाने सोलापुरातील डागा यांच्या घरावर शनिवारी (ता. 20) छापा टाकला. त्यावेळी त्यांच्या घरात साडेसात कोटींची रोकड मिळाली. नोटा मोजण्याच्या मशिनद्वारे रोकड मोजण्यात आली असून रक्‍कम बॅंकेत जमा करण्यासाठी सुट्टीतही बॅंका सुरु ठेवाव्या लागल्या, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

कर चुकविण्यासाठीच केला अट्टाहास
ऑनलाइन व्यवहार केल्यानंतर त्यावर ठरावीक टक्‍क्‍यांमध्ये प्राप्तीकर भरणे बंधनकारक आहे. मात्र, ऑनलाइन व्यवहार कमी दाखवून रोख स्वरुपातच सर्वाधिक व्यवहार या कंपन्यांकडून सुरु होते, अशीही चर्चा आहे. खाद्यतेल विक्रीतून मिळालेली रक्‍कम आणि कच्चा माल खरेदीची रक्‍कम, यातील बहुतांश व्यवहार रोखीनेच केले जात होते, असेही सूत्रांनी सांगितले. आता देशभरातील सर्व कंपन्या तथा त्यांच्या घरातून जप्त केलेली रक्‍कम प्राप्तीकर विभागाने जप्त केली आहे. त्याबाबत प्राप्तीकर विभागातील वरिष्ठ अधिकारी लवकरच अधिकृतपणे माहिती जाहीर करतील, असेही सांगण्यात आले. ही कारवाई केंद्रीय स्तरावरील आदेशानुसार केल्याची चर्चा आहे. 

डागा यांच्या घरावर छापा टाकल्यानंतर त्यांच्या घरातील एक कर्मचाऱ्याला बॅग घेऊन पळून जाताना प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी पकडले. त्यानंतर दुसरी बॅगही अधिकाऱ्यांना मिळाली. डागा यांच्या घरात एवढी मोठी रक्‍कम आली कुठून, याचे उत्तर कोणीही देऊ शकले नाही. त्यानंतर प्राप्तीकर विभागाने ती रक्‍कम जप्त केली आणि राष्ट्रीयीकृत बॅंकेत जमा करुन टकाली, असेही सूत्रांनी सांगितले. दरम्यान, डागा यांच्या देशभरातील कंपन्यांनी हवालाच्या माध्यमातून पैसे पाठवल्याचे आणि वेळोवेळी मागविल्याचे पुरावेही यावेळी प्राप्तीकर विभागाला मिळाल्याचे सांगण्यात आले.

loading image