esakal | "महाविकास आघाडीत कॉंग्रेसची घुसमट ! राष्ट्रवादी नऊ जिल्ह्यांपुरतीच'
sakal

बोलून बातमी शोधा

Congree

"महाविकास आघाडीत कॉंग्रेसची घुसमट! राष्ट्रवादी नऊ जिल्ह्यांपुरतीच'

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

राष्ट्रवादी कॉंग्रेस हा नऊ जिल्ह्यांपुरताच पक्ष आहे. कॉंग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असून आम्ही काका-पुतण्याच्या ताटाखालचे मांजर नाही आहोत, असेही माळी यांनी सोलापुरातील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

सोलापूर : राज्यात कॉंग्रेस (Congrss), शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) या तिन्ही पक्षाचे महाविकास आघाडीचे सरकार (Mahavikas Aghadi government) आहे. मात्र, कॉंग्रेसच्या वाट्याला दिलेली मंत्रिपदे आणि आम्हाला मिळणारा निधी अन्य पक्षांच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी असून त्यांची घुसमट होत असल्याने आगामी निवडणुकांमध्ये कॉंग्रेस स्वबळावरच लढेल, असे कॉंग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी (Bhanudas Mali, State President, Congress OBC Cell) यांनी आज सोलापुरात स्पष्ट केले. (Congress OBC cell state president Bhanudas Mali's press conference in Solapur)

हेही वाचा: पोलिसांच्या सतर्कतेमुळे फुटली खुनाला वाचा ! चितेवरील मृतदेह काढून पोस्टमॉर्टेम

राष्ट्रवादी कॉंग्रेस हा नऊ जिल्ह्यांपुरताच पक्ष आहे. कॉंग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असून आम्ही काका-पुतण्याच्या ताटाखालचे मांजर नाही आहोत, असेही माळी यांनी सोलापुरातील पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. महाविकास आघाडीत कॉंग्रेसची होणारी घुसमट आणि सापत्न वागणुकीबद्दल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षश्रेष्ठींना त्यांची भूमिका पटवून दिली आहे राज्यात स्वबळावर निवडणुका लढविण्यास पक्षश्रेष्ठींकडून होकार आल्याचेही माळी यावेळी म्हणाले. प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या सूचनांनुसारच मी राज्यभर ओबीसी समाजाचे संघटन मजबूत करण्यासाठी दौरे करीत असून सोलापूर हा 21 वा जिल्हा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये आम्हाला गणले जात नसून कार्यकर्त्यांची घुसमट होत असल्याचा सूर ऐकायला मिळत आहे. त्यामुळे आम्ही आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी ठेवल्याचे ही त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.

हेही वाचा: "पीएसआय'ने स्वीकारली साडेसात लाखांची लाच! "लाचलुचपत'ने पकडले रंगेहाथ

आरक्षणमुक्त भारताचा भाजपकडून प्रयत्न

2009 ते 2013 या काळामध्ये आमच्या सरकारने सामाजिक सर्वेक्षण करून इम्पीरियल डाटा तयार केला होता. तोच डाटा केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात ()Supreme Court सादर करावा, अशी आमची प्रमुख मागणी आहे. परंतु, तत्कालीन फडणवीस सरकारने (Fadnavis Government) ओबीसी समाजाला आरक्षण (OBC reservation) मिळू नये म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न केला. आरक्षणमुक्त भारत करण्याचा डाव आरक्षण आरएसएसच्या माध्यमातून भाजपने असल्याचेही माळी यांनी यावेळी सांगितले. परंतु, आगामी निवडणुकांमध्ये ओबीसी समाजाच्या आरक्षण न भेटल्यास त्यांना पक्षांतर्गत आरक्षण देऊन निवडणुकीत संधी दिली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रीपद निश्‍चित

ओबीसी समाजाच्या अडीअडचणी राज्य व केंद्र स्तरावर ठामपणे मांडणे आवश्‍यक आहे. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Former Union Home Minister Sushilkumar Shinde) यांनी पक्षवाढीसाठी खूप कष्ट केले आहेत. त्याची पोचपावती म्हणून आमदार प्रणिती शिंदे (MLA Praniti Shinde) यांना निश्‍चितपणे आगामी मंत्रिमंडळ विस्तारात कॉंग्रेसकडून मंत्रीपद मिळेल असा विश्वासही माळी यांनी यावेळी व्यक्त केला.

loading image