Mangalwedha News : मंगळवेढ्याच्या जडणघडणीत पत्रकाराचे योगदान मोठे - प्रशांत साळे

मुक्या लोकांच्या प्रश्ना साठी नायक व्हावे या दृष्टिकोनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे वर्तमानपत्र सुरू केले.
congress prashant sale says mangalwedha development contribution of journalists
congress prashant sale says mangalwedha development contribution of journalistsSakal

भोसे : राज्यभर संताचा तालुका म्हणून परिचित असलेला मंगळवेढा तालुक्याला अधिक प्रमाणात घडविण्यात स्थानिक पत्रकाराचे योगदान मोठे असल्याचे गौरवोद्गार काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांनी व्यक्त केले.

पत्रकार दिनाच्या निमित्ताने काँग्रेस कार्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या ते बोलत होते यावेळी दिलीप जाधव,दादा पवार,अमोल म्हमाने, महिला तालुकाध्यक्षा जयश्री कवचाळे, शिवशंकर कवचाळे,पांडुरंग मेहरकर, सैपन शेख, बापू अवघडे,

सुनिता अवघडे, संदीप पवार, अजय आदाटे,मारूती वाकडे, पत्रकार संघाचे संस्थापक दिगंबर भगरे,शिवाजी पुजारी,अॅड दत्तात्रय तोडकरी,दावल इनामदार, भीमराव मोरे, गुरुदेव स्वामी, महेश पाटील, श्रीकांत मेलगे, आदीसह विविध दैनिकाचे व साप्ताहिकाचे पत्रकार, संपादक यावेळी उपस्थित होते.

तत्पूर्वी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष साळे म्हणाले की, पत्रकाराची लेखणी जनतेच्या प्रश्नावर जेवढी आक्रमक तेवढी राज्यकर्त्याला भीती असते त्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न सुटण्यास मदत होते.

मुक्या लोकांच्या प्रश्ना साठी नायक व्हावे या दृष्टिकोनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे वर्तमानपत्र सुरू केले. पत्रकारांच्या लेखणीमुळे राज्यकर्त्यांना सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांची जाणीव होते त्यामुळे ते सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत असतात त्यामुळे जे पत्रकार जनतेच्या प्रश्नावर लिहीत असतात त्यांच्यामुळे त्यांच्या प्रश्नाला वाचा देखील फुटते.

मंगळवेढ्यातील अनेक रखलेल्या प्रश्नाला शहरातील जेष्ठ पत्रकारांनी त्यांना बातमीच्या माध्यमातून आवाज उठवल्यामुळे ते प्रश्न सुटण्यास मदत झाली. मात्र तरी देखील अजून काही प्रश्न सोडवण्यासाठी पत्रकारांनी सामुदायिक रित्या आक्रमक व्हावे त्यासाठी आम्ही देखील त्यांच्यासोबत त्या प्रश्नासाठी राहू.

सध्या तालुक्यातील स्मारक,शेतीचे पाणी,रोजगार,या प्रश्नावर पत्रकार आक्रमक लिहीत आहेत मात्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्याचे पडसाद भविष्यात दिसून येणार आहेत. सूत्रसंचालन अजय आदाटे यांनी केले तर आभार दिलीप जाधव यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com