माढ्यात काॅंग्रेसच्या वतीने पेट्रोल व डिझेल दरवाढीचा निषेध 

petrol.jpg
petrol.jpg
Updated on

माढा(सोलापूर): आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती पाहता पेट्रोल डिझेलच्या किमंती कमी कराव्यात अशी मागणी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. 

माढा तालुका कॉंग्रेसकडून इंधन दरवाढीच्या विरोधात माढा तहसिल कार्यालयात निवेदन देण्यात आले. पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात माढा तालुका कॉंग्रेसकडून गुरुवारी (ता. 2) माढा तहसिल कार्यालयात दिलेल्या निवेदनात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती पाहता पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्याची मागणी केली आहे. 
यावेळी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब साठे यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष सौदागर जाधव, सोलापूर जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस रामभाऊ वाघमारे,जिल्हा युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष शाहुराजे जगताप, माढा विधानसभा युवा अध्यक्ष भाऊ वाघ, माजी नगराध्यक्ष राहुल लंकेश्वर, धनंजय मोरे, निलेश बंडगर, विजय सातपुते, हमिद शिखलकर, प्रताप कदम, हनुमंत राऊत उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

How was salt sold as fertilizer in Maharashtra?
Will Solapur IT Park shift from Hotgi Road?
Barshi Shocked by Death of Headmaster, Wife and Two Sons; Police Investigating Case
barshi crime
Marathi News Esakal
www.esakal.com