पंढरपूरकरांना दिलासा; 'त्या' महिलेच्या संपर्कातील सर्व 49 रिपोर्ट निगेटिव्ह 

Consolation to Pandharpurkar all 49 reports of contact with that woman were negative
Consolation to Pandharpurkar all 49 reports of contact with that woman were negative
Updated on

पंढरपूर (जि. सोलापूर) : पंढरपूर येथील एका हॉस्पिटलमध्ये प्रसुती झालेल्या मोहोळ तालुक्‍यातील महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे तिच्या संपर्कात आलेल्या 49 जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यामुळे पंढरपुरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. 
मोहोळ तालुक्‍यातील पाटकुल येथील एका महिलेची पंढरपुरातील हॉस्पिटलमध्ये प्रसूती झाली होती. त्यानंतर संबंधित महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे खळबळ उडाली होती. प्रशासनाने तातडीने संबंधित हॉस्पिटलशी संपर्क साधून त्या महिलेच्या संपर्कात आलेले डॉक्‍टर, नर्स आणि अन्य व्यक्तींची यादी तयार केली आणि त्या सर्वांना क्वारंनटाईन केले. 
दरम्यान, कोरोना रुग्णाच्या संपर्कात आल्यानंतर पाच दिवसाने स्वॅब टेस्ट घेतल्यास नेमका रिपोर्ट मिळतो. त्यामुळे या सर्व 49 जणांची टेस्ट घेण्याचा निर्णय झाला होता. यापूर्वी संबंधित लोकांना टेस्टसाठी सोलापूर येथे पाठवले जात होते. प्रथमच येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. जयश्री ढवळे आणि त्यांच्या टीमने संबंधित लोकांचे स्वॅब घेतले. हे सर्व नमुने सोलापूर येथे पाठवण्यात आले होते. या टेस्टचा अहवाल काय येतो याकडे पंढरपूरकर शहर आणि तालुक्‍याचे लक्ष लागले होते. आज या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com