
उ. सोलापूर : राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकने पेट घेतल्याची दुर्घटना घडली आहे. रविवारी (ता. २) दुपारी लागलेल्या या आगीमुळे ट्रकसह आतमध्ये असलेले बटाटे जळून खाक झाले. वाहकाने गाडीमध्ये आग लागण्याचे कारण माहीत नसल्याचे सांगितले, तरी चालू गाडीमध्ये स्वयंपाक करत असल्यामुळेच आग लागल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.