Sugar Factory
sakal
- संदीप गायकवाड
उ. सोलापूर - एकेकाळी सहकारी साखर कारखानदारीची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात आज सहकाराची गोडी ओसरताना दिसत आहे. जिल्ह्यातील १६ सहकारी साखर कारखान्यांपैकी चार कारखाने बंद पडले असून, दोन कारखाने भाडेपट्ट्यावर चालविले जात आहेत.
आर्थिक अडचणींमुळे येत्या गाळप हंगामात आणखी चार कारखाने भाडेपट्ट्यावर जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. केंद्र सरकारची धोरणे, वाढता उत्पादन खर्च, साखरेला मिळणारा कमी दर आणि काही कारखान्यांतील व्यवस्थापनातील त्रुटी यामुळे सहकारी साखर उद्योग अडचणीत सापडल्याचे चित्र आहे.