कोरोनाबाधिताच्या संपर्कातील व्यक्तींना हॉटेलमध्येही होता येईल क्वारंटाईन 

corona
corona
Updated on

सोलापूर : कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना/संशयित रुग्णांना सोलापूर महापालिकेने मोठा दिलासा दिला आहे. दवाखान्यात किंवा क्वारंटाईन सेंटरवर गेल्यास कोरोनाची लागण होण्याची भीती अनेकांना असल्याने काही जण या ठिकाणी जाण्याचे टाळत आहेत. ज्यांना पैसे भरून चांगल्या ठिकाणी क्वारंटाईन होण्याची इच्छा आहे अशा व्यक्तींसाठी सोलापूर महापालिकेने परवानगी दिली आहे. त्यासाठी सोलापुरातील हॉटेल्स निश्‍चित करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त पंकज जावळे यांनी दिली. 

कोरोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या किंवा संशयित रुग्णांना महापालिकेच्यावतीने इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात येते. महानगरपालिकेच्या सेवेच्या ऐवजी ज्यांना हॉटेल्समध्ये क्वारंटाईन व्हायचे आहे. त्यांना स्वखर्चाने हॉटेल्समध्ये इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन होण्यास महापालिकेने परवानगी दिली आहे.

स्वखर्चाने अलगीकरण /विलगीकरण (पेड क्वारंटाईन) होण्यासाठी मार्गदर्शक सूचना संबंधित रुग्णावर व हॉटेल व्यावसायिकांवर बंधनकारक राहणार आहेत. त्याचप्रमाणे हॉटेल व्यावसायिकांनी त्यांच्या हॉटेलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांचा दैनंदिन तपशील सोलापूर महानगरपालिकेच्या (कंट्रोल रूम या ईमेल ccsmc2020@gmail.com) या आयडीवर पाठवावा लागणार आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या हॉटेलमधील उपलब्ध सुविधेबाबत व इतर मार्गदर्शक सूचना फलक दर्शनी भागावर लावणे बंधनकारक राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com