कोरोना परतीच्या वाटेवर! आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील २.१६ लाख रुग्ण कोरोनामुक्त

आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख ३२ हजार १४६ पुरुष आणि ८९ हजार ३९२ महिलांना कोरोना होऊन गेला. त्यातील दोन लाख १६ हजार २३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आता मोहोळ व उत्तर सोलापूर हे तालुके कोरोनामुक्त झाले असून सध्या शहरात ७ तर ग्रामीणमध्ये ४३ रुग्ण आहेत.
sakal
sakalsakal

सोलापूर : पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेकांना मृत्यूचा अनुभव देणारा कोरोना आता पुन्हा एकदा हद्दपारीच्या वाटेवर आहे. जिल्ह्यातील पाच हजार २४१ जणांचा जीव घेणाऱ्या कोरोनाची तीव्रता प्रतिबंधित लसीकरणामुळे बोथट झाली. आतापर्यंत जिल्ह्यातील एक लाख ३२ हजार १४६ पुरुष आणि ८९ हजार ३९२ महिलांना कोरोना होऊन गेला. त्यातील दोन लाख १६ हजार २३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. आता मोहोळ व उत्तर सोलापूर हे तालुके कोरोनामुक्त झाले असून सध्या शहरात ७ तर ग्रामीणमध्ये ४३ रुग्ण आहेत.

जिल्ह्यातील ४३ मुलांना अनाथ करणारा आणि जवळपास अकराशे कुटुंबाचा आधार हिरावणारा कोरोना आता हद्दपार होत आहे. नागरिकांनी मास्क, गर्दी टाळल्याने आणि प्रतिबंधित लसीचे डोस घेतल्याने ते शक्य झाले आहे. प्रतिबंधित लसीकरणामुळे मृत्यूदर घटला. आता कोरोना झालेल्या रुग्णाला कोणतीही तीव्र स्वरुपाची लक्षणे आढळत नाहीत. त्यांना घरीच उपचार करण्याची मुभा आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घेतल्याने चार ते सहा दिवसांत तो रुग्ण बरा होऊ लागला आहे. कोरोना काळात आतापर्यंत जिल्ह्यात ३५ लाख ३० हजार ९७६ संशयितांच्या टेस्ट करण्यात आली. त्यानुसार शहरातील २० हजार १५ पुरुषांना व १४ हजार २५४ महिलांना कोरोनाची बाधा झाली. त्यातील ५४७ महिला आणि ९६४ पुरुषांचा कोरोनाने जीव घेतला. ग्रामीणमधील एक लाख १२ हजार १३१ पुरुष तर ७५ हजार १३८ महिलांना कोरोनाची बाधा झाली. जिल्ह्यातील जवळपास २६ लाख व्यक्तींनी कोरोनावरील प्रतिबंधित लस घेतली आहे. आता अक्कलकोट, माढा, माळशिरस व दक्षिण सोलापूर या तालुक्यांचा शहरी भाग कोरोनामुक्त झाला आहे. मोहोळ व उत्तर सोलापूर तालुके कोरोनामुक्त झाले असून उर्वरित प्रतयेक तालुक्यातील सक्रिय रुग्णसंख्या दहापेक्षा कमी आहे.

सर्वांनी पाळावेत ‘हे’ नियम

  • स्वच्छता व बाहेरून घरी आल्यावर हातपाय स्वच्छ धुवा

  • जास्त गर्दीत जावू नका; प्रतिबंधित लसीचे तिन्ही डोस घ्या

  • सर्दी, खोकला, ताप अंगावर काढू नका

  • नियमित व्यायाम, योगा करण्याची हवी सवय

जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती

  • एकूण टेस्टिंग

  • ३५,३०,९७६

  • एकूण बाधित

  • २,२१,५३८

  • कोरोनाचे मृत्यू

  • ५,२४१

  • कोरोनामुक्त व्यक्ती

  • २,१६,२३६

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com