esakal | जिल्ह्यात 11 हजार 849 ऍक्‍टिव्ह रुग्ण ! 1468 नव्याने वाढले; 43 जणांचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

Corona Update
जिल्ह्यात 11 हजार 849 ऍक्‍टिव्ह रुग्ण ! 1468 नव्याने वाढले; 43 जणांचा मृत्यू
sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : शहरातील रुग्णसंख्या कमी होत आहे, परंतु मृत्यू वाढल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. आज शहरातील 24 तर ग्रामीणमधील 19 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे शहरात आज 290 तर ग्रामीणमध्ये एक हजार 178 रूग्ण वाढले आहेत. शहर-जिल्ह्यातील ऍक्‍टिव्ह रूग्णांची संख्या आता 11 हजार 849 झाली असून आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे.

शहरात आतापर्यंत 22 हजार 980 जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातील 979 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे आतापर्यंत ग्रामीणमधील 62 हजार 399 व्यक्‍ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या असून त्यातील एक हजार 470 रूग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरातील तीन हजार 476 तर ग्रामीणमधील आठ हजार 373 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आज अक्‍कलकोट तालुक्‍यात 28, बार्शीत 162, करमाळ्यात 102, माढ्यात 157, माळशिरसमध्ये 214, मंगळवेढ्यात 73, मोहोळ तालुक्‍यात 124, उत्तर सोलापुरात 35, पंढरपूर तालुक्‍यात 154, सांगोल्यात 75 आणि दक्षिण सोलापूर तालुक्‍यात 55 रूग्ण आढळले आहेत. तर बार्शी व करमाळा तालुक्‍यातील प्रत्येकी तिघांचा आणि मंगळवेढा व दक्षिण सोलापूर तालुक्‍यातील प्रत्येकी दोघांचा कोरोनाने बळी घेतला आहे. माढ्यातील पाच जणांचा, मोहोळ तालुक्‍यातील चौघांचा रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना बाधितांची संख्या ग्रामीणमध्ये वाढू लागली आहे. तर शहरातील रूग्णांच्या तुलनेत मृत्यूदर वाढू लागला आहे. विशेष म्हणजे मृतांमधील बरेच रूग्ण मागील चार ते आठ दिवसांपासून उपचार घेत होते. आरोग्य विभागाने नागरिकांना आवाहन केले असून मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. तर लक्षणे असलेल्यांनी कोरोनाची टेस्ट करून वेळेत उपचार घ्यावेत, असेही सांगितले आहे.

जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती...

 • एकूण रूग्णसंख्या : 85,379

 • मृत्यू : 2,449

 • ऍक्‍टिव्ह रूग्ण : 11,849

 • बरे झालेले रूग्ण : 71,081

 • मृत्यू व संसर्गाची कारणे....

 • त्रास होत असतानाही आजार अंगावर काढण्याचे वाढले प्रमाण

 • लक्षणे असतानाही टेस्टसाठी संशयितांकडून नकार

 • पॉझिटिव्ह व्यक्‍तींकडून संपर्कातील व्यक्‍तींची लपविली जातेय माहिती

 • मास्क, सोशल डिस्टन्सिंगसह अन्य नियमांचे लोकांना नाही गांभीर्य

 • रूग्णालयात उपचारासाठी जाण्यास रूग्ण करू लागलेत विलंब

 • पूर्वीचा विषाणू को-मॉर्बिड रूग्णांसाठीच घातक होता; आता विषाणूचा संसर्ग वाढला असून लहान मुलांपासून सर्वांनाच होतोय संसर्ग