esakal | पंढरपूर, मंगळवेढ्याचीच चिंता ! जिल्ह्यात आज वाढले 1449 रुग्ण; 40 जणांचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

coronavirus
पंढरपूर, मंगळवेढ्याचीच चिंता ! जिल्ह्यात आज वाढले 1449 रुग्ण; 40 जणांचा मृत्यू
sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : पोटनिवडणुकीनंतर मंगळवेढा व पंढरपूर तालुक्‍यात रुग्ण वाढू लागले आहेत. परंतु, चिंतेची बाब म्हणजे मागील दहा दिवसांत पंढरपूर तालुक्‍यात अडीच हजार रुग्ण वाढले असून त्यातील 20 जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, मंगळवेढ्यात 5 ते 14 एप्रिल या काळात 733 रुग्ण वाढले असून त्यातील 19 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आज शहरात 338 रुग्ण वाढले असून तब्बल 22 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ग्रामीणमध्ये एक हजार 111 रुग्ण आढळले असून 18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनामुळे आज आडवा रस्ता (बार्शी) येथील 32 वर्षीय तरुणाचा, सिद्धापूर (मंगळवेढा), पंत नगर, कवठे गल्ली (पंढरपूर), बासलेगाव (अक्कलकोट), कुंभार खानी (मोहोळ), विद्या नगर (शेळगी), श्रीनगर (जुळे सोलापूर), जयकुमार नगर (विजयपूर रोड), सोनी नगर (मोदी खाना) येथील मृत रुग्णांचे वय 48 पेक्षाही कमीच होते. तर बरेच रुग्ण दवाखान्यात उपचारासाठी विलंबाने दाखल झाल्याचेही रिपोर्टवरून स्पष्ट होते.

आज पंढरपूर तालुक्‍यात 212 रुग्ण तर मंगळवेढ्यात 34 रुग्ण वाढले असून दोन्ही तालुक्‍यात प्रत्येकी पाच रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मोहोळ तालुक्‍यात 64 रुग्ण वाढले असून तिघांचा मृत्यू झाला आहे. तर करमाळ्यात 125, उत्तर सोलापुरात 68, सांगोल्यात 59, दक्षिण सोलापुरात 18 रुग्ण वाढले आहेत. तसेच बार्शीत 126 रुग्ण वाढले असून दोघांचा तर माळशिरसमध्ये 232 रुग्ण वाढले असून त्या ठिकाणीही दोघांचा मृत्यू झाला आहे. माढ्यात 155, अक्कलकोट तालुक्‍यात 18 रुग्ण वाढले असून एकाचा मृत्यू कोरोनामुळे झाला आहे. आता जिल्ह्याची रुग्णसंख्या 84 हजारांच्या उंबरठ्यावर पोचली असून मृतांची वाटचाल अडीच हजारांकडे सुरू आहे.

ठळक बाबी...

  • दहा दिवसांत पंढरपूर तालुक्‍यात वाढले 2516 रुग्ण तर 20 जणांचा मृत्यू

  • मंगळवेढा तालुक्‍यात दहा दिवसांत 733 रुग्णांची वाढ अन्‌ 19 जणांचा बळी

  • आज शहरात 338 रुग्णांची वाढ तर तब्बल 22 जणांचा मृत्यू

  • ग्रामीण भागात वाढले 1111 रुग्ण तर 18 जणांचा कोरोनाने घेतला बळी

  • शहर-जिल्ह्यातील एक हजार 243 रुग्ण झाले बरे; सध्या 11 हजार 494 ऍक्‍टिव्ह रुग्ण