एकाच खोलीत राहणाऱ्या 'त्या' पोलिसामुळे मित्राला झाला कोरोना

Corona positive friend due to police
Corona positive friend due to police
Updated on

सोलापूर : कोरोनाच्या वैश्विक संकटाला हद्दपार करण्यासाठी राज्यभर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या 210 पैकी तब्बल 180 मार्ग बंद करून त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त लावला आहे. दरम्यान, शनिवारी (ता. 2) ग्रामीण भागात बंदोबस्त देणाऱ्या व शहरातील पोलीस मुख्यालयाशेजारील ग्रामीण पोलिस वसाहतीतील एकाच खोलीत राहणाऱ्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यानुसार शहर पोलिस मुख्यालयाच्या शेजारील ग्रामीण मुख्यालयाच्या पोलीस वसाहतीचाचा भाग प्रतिबंधित करण्यात आला आहे.

आतापर्यंत सोलापुरात सापडलेल्या 111 रुग्णांमध्ये ग्रामीण भागातील आहेत तीन रुग्ण आहेत. सांगोला तालुक्यातील घेरडी तर मोहोळ तालुक्यातील पेनुर आणि अक्कलकोट तालुक्यातील चपळगाव याठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. उर्वरित तालुक्यांमध्ये अद्यापही कोरोनाबाधित रुग्ण सापडला नाही. परंतु, ग्रामीण मुख्यालयाच्या पोलिस वसाहतीत राहणाऱ्या या दोन पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त नेमका कुठे होता, त्यांना कोणत्या ठिकाणी, कोणाच्या संपर्कातून कोरोना झाला, याचा तपास आता युद्ध पातळीवर सुरु झाला आहे. राज्यभरात सुमारे तीनशेहून अधिक पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून सोलापूर शहर जिल्ह्यातील पोलिस कर्मचारी व अधिकारी कोरोनापासून चार हात लांब होते. मात्र, शनिवारी ग्रामीण मुख्यालयात राहणारे दोन पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पोलीस दलात खळबळ माजली आहे. ही पोलीस वसाहत शहर पोलीस वसाहतीच्या लगतच आहे.

'ते' दोघेही राहत होते एकाच रूममध्ये
उस्मानाबाद जिल्ह्यातील चिखली या गावचा रहिवासी असलेला एक पोलीस कर्मचारी सुट्ट्या संपवून काही दिवसांपूर्वी सोलापुरात ग्रामीण पोलीस दलात बंदोबस्तासाठी दाखल झाला. सोलापूर जिल्ह्यात येणारे बहुतांश रस्ते बंद केल्याने त्या पोलिस कर्मचाऱ्याला सांगोला, बार्शी अशा विविध ठिकाणी ड्युटी देण्यात आल्या होती. तो पोलीस कर्मचारी सोलापूर शहरातील ग्रामीण पोलीस मुख्यालयातील वसाहतीत राहण्यास होता. या पोलीस कर्मचाऱ्यांच्या खोलीत त्याचा दुसरा एक पोलीस मित्र राहत होता. एकाच्या संपर्कातून दुसऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली. या दोघांच्या संपर्कातील तर उस्मानाबाद जिल्ह्यातून आलेल्या त्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबासह त्यांच्या संपर्कातील काही लोकांना आरोग्य विभागाने तपासणीसाठी ताब्यात असल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, त्या दोघांपैकी नेमका सर्वप्रथम झाला कोणाला, याची माहिती पडताळण्यासाठी ट्रॅव्हल हिस्ट्रीचा शोध युद्धपातळीवर सुरू असल्याचेही झेंडे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

solapur city police
solapur
Suryan Mukne from Pandharpur selected as Sub-Lieutenant in Indian Navy
34th Water Struggle Council in Mangalwedha demands completion of irrigation projects
Marathi News Esakal
www.esakal.com