गुड न्यूज....सोलापुरात दोन ठिकाणी होणार कोरोनाची स्क्रीनिंग

गुड न्यूज....सोलापुरात दोन ठिकाणी होणार कोरोनाची स्क्रीनिंग
Updated on

सोलापूर : सोलापुरात दिवसेंदिवस वाढत चाललेली कोरोनाबाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन व राज्य सरकार युद्धपातळीवर कामाला लागले आहे. सोलापूर शहरात असलेल्या दोन टीबी  सेंटर मध्ये कोरोनाची स्क्रीनिंग टेस्ट केली जाणार आहे. सोलापुरातील कोरोनाबाधित रुग्ण अधिक लवकर शोधण्यासाठी यामुळे मोठी मदत होणार आहे. 

पुणे महसूल विभागाचे आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर बुधवारी सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. सोलापूरच्या दौर्‍यात त्यांनी कोरोना  संदर्भात केल्या जात असलेल्या विविध उपाययोजनांचा आढावा घेतला. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि कोरोना टेस्टिंग अधिक जलद गतीने करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत. सोलापुरातील डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाची टेस्ट केली जात आहे. याठिकाणी दिवसाला 125 रुग्णांची टेस्ट करण्याची सुविधा उपलब्ध आहे. उस्मानाबाद व सोलापूर अशा दोन जिल्ह्यांसाठी या महाविद्यालयातील प्रयोगशाळा काम करत आहे.

सोलापूर शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने सध्या असलेल्या प्रयोग शाळेवर काहीसा ताण आला आहे. सोलापुरातील दोन टीबी सेंटर मध्ये कोरोनाची स्क्रीनिंग टेस्ट होणार असल्याने प्रयोग शाळेवरील काहीसा ताण हलका होणार आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या अंतर्गत सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात व सोलापूर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अंतर्गत डफरीन चौक येथे टीबी सेंटर कार्यान्वित आहेत. या दोन्ही ठिकाणी दिवसाला प्रत्येकी किमान 25 पर्यंत कोरोनाच्या स्क्रीनिंग टेस्टची सुविधा उपलब्ध होणार आहे. या टेस्ट साठी आवश्यक असलेली (true nat) मशिनरी मागविण्यात आली असून लवकरच ही मशिनरी सोलापुरात दाखल होणार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Solapur Weather Update
MSEDCL Load Shedding Hits Penur Farmers Ujani Canal Full But Power Shortage Causes Sugarcane And Other Crops To Dry
Marathi News Esakal
www.esakal.com