esakal | "कोरोना'मुळे शिक्षक संघाचे अधिवेशन स्थगित 
sakal

बोलून बातमी शोधा

"कोरोना'मुळे शिक्षक संघाचे अधिवेशन स्थगित 

शिक्षकांची रजा रद्द 
शिक्षक संघाच्या अधिवेशनासाठी शिक्षकांना नऊ ते 14 मार्चपर्यंत नैमित्तिक रजा शासनाने मंजूर केली होती. मात्र, ज्यासाठी ही रजा मंजूर केली, ते अधिवेशनच रद्द झाल्याने शिक्षकांच्या रजाही रद्द झाल्या आहेत. 

"कोरोना'मुळे शिक्षक संघाचे अधिवेशन स्थगित 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

सोलापूर ः प्राथमिक शिक्षक संघाचे नागोठणे (जि. रायगड) येथे 13 मार्चला अधिवेशन होणार होते. त्यासाठी राज्यातील कर्मचाऱ्यांना नऊ ते 14 मार्च या कालावधीसाठी सुटीही जाहीर केली होती. मात्र, कोरोना व्हायरसचे कारण पुढे करत हे अधिवेशन स्थगित केले आहे. अधिवेशनाची पुढील तारीख नंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. 

राज्यात कोरोना व्हायरसचा अनेकांनी धसका घेतला आहे. एकाच ठिकाणी एकापेक्षा अनेकजण जमा होणे म्हणजे कोरोनाला सहकार्य करण्यासारखे आहे. हा रोग संसर्गजन्य असल्याने त्याचा फैलाव अतिशय वेगाने होत आहे. शिक्षक संघाच्या अधिवेशनासाठी हजारोंवर शिक्षक येणार होते. त्या ठिकाणी संसर्गाचा धोका निर्माण होईल म्हणून हे अधिवेशन स्थगित करण्याचे आदेश शासनाने शिक्षक संघाला दिले आहेत. त्यामुळे शिक्षक संघाने हा निर्णय घेतल्याचे संघाचे राजाध्यक्ष बाळ तांबारे यांनी म्हटले आहे. याशिवाय अधिवेशनाची पुढची तारीख निश्‍चित करून सर्व शिक्षकांना कळविली जाईल, असेही त्यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 
रायगड जिल्ह्यात होणाऱ्या शिक्षकांच्या या अधिवेशनाची तयारी पूर्ण झाली होती. मंडप उभारणी अंतिम टप्प्यात आली होती. या अधिवेशनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री उपस्थित राहणार होते. मात्र, त्यांनीच "कोरोना'चे कारण पुढे करत हे अधिवेशन पुढे ढकलण्यास सांगितले असल्याचेही श्री. तांबारे यांनी सांगितले. 

loading image