जिल्ह्यातील टेस्टिंग 13 लाखांच्या टप्प्यावर !

जिल्ह्यात कोरोना टेस्टिंग 13 लाखांच्यावर करण्यात आल्या आहेत
Corona
CoronaMedia Gallery
Updated on

सोलापूर : जिल्ह्यातील 12 लाख 91 हजार 646 संशयितांची आतापर्यंत कोरोना (Covid-19) चाचणी करण्यात आली आहे. त्यात एक लाख 34 हजार 770 रूग्णांपैकी एक लाख 13 हजार 256 रूग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या शहरातील 970 तर ग्रामीणमधील 16 हजार 848 रूग्णांवर उपचार सुरू आहेत. सोमवारी ग्रामीणमध्ये दोन हजार 172 तर शहरात 61 रुग्ण वाढले असून ग्रामीणमधील 35 तर शहरातील 15 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. दुसरीकडे आज एक हजार 885 रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. (Corona testing has been done on over 13 lakh in the Solapur district)

Corona
सोन्यासारखी माणसं वाचली पाहिजेत! मुलाच्या समाजकार्यात आईची जमापुंजी

शहरातील कोरोनाचे संकट दूर होत असतानाच रूग्णसंख्या घटली आहे. मात्र, मृत्यूदर कमी झालेला नाही. दुसरीकडे ग्रामीण भागाची चिंता कायम असून मोहोळ, दक्षिण सोलापूर, पंढरपूर, करमाळा या तालुक्‍यात मृत्यू वाढत आहेत. आज अक्‍कलकोट तालुक्‍यात 69, माढ्यात 284, सांगोल्यात 234 रूग्ण वाढले आहेत. तर बार्शी तालुक्‍यात 507 रूग्ण वाढले असून एकाचा मृत्यू झाला आहे. तसेच करमाळ्यात 136 रूग्ण वाढले असून तालुक्‍यातील सात रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. माढ्यात 154 तर मंगळवेढ्यात 299 रूग्ण वाढले असून दोन्ही तालुक्‍यात प्रत्येकी चौघांचा मृत्यू झाला आहे. तसेच मोहोळ तालुक्‍यात 75 रूग्ण वाढले असून पाचजणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. उत्तर सोलापूर तालुक्‍यात 27 रूग्ण वाढले असून एकाचा मृत्यू झाला आहे. पंढरपूर तालुक्‍यात 369 रूग्ण वाढले असून सातजणांचा मृत्यू झाला आहे. तसेच दक्षिण सोलापूर तालुक्‍यात 18 रूग्ण वाढले असून सहाजणांचा मृत्यू झाला आहे.

Corona
तरुण ठरताहेत कोरोनाचे बळी ! 17120 रुग्णांवर सुरू आहेत उपचार

24 व 30 वर्षीय तरूण कोरोनाचे बळी

शहरातील पाच तर ग्रामीणमधील दहा महिलांचा तर शहरातील 10 आणि ग्रामीणमधील 22 पुरूषांचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यात चिंतेची बाब म्हणजे गवळी वस्ती (लक्ष्मी पेठ परिसर) येथील 24 वर्षीय तरूणांचा, बाळे येथील नामदेव सोसायटीतील 36 वर्षीय तरूणाचा आणि ग्रामीणमधील हत्तूर (ता. दक्षिण सोलापूर) येथील 30 वर्षीय तरूणाचा समावेश आहे. काही दिवस अंगावर आजार काढून अंतिम टप्प्यात उपचारासाठी रूग्णालयात दाखल होण्यामुळेच बहुतांश तरूण कोरोनाचे बळी ठरत आहेत. त्यामुळे लक्षणे असलेल्यांनी तत्काळ कोरोना चाचणी करून निदान करून घेण्याची गरज आहे. तसेच मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे तंतोतंत पालन केल्यास कोरोनापासून दूर राहणे शक्‍य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

 Tukaram Mundhe
civil hospital
Minor Argument Turns Fatal: 24-Year-Old Auto Driver Murdered in Pandharpur
Solapur
Marathi News Esakal
www.esakal.com