सोलापूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दोन लाखांच्या पार

सोलापुरात 12 एप्रिलला सापडला पहिला रुग्ण ! आता रुग्णसंख्या दोन लाखांहून अधिक
Corona-patient
Corona-patientsakal

सोलापूर : संपूर्ण जगाला वेठीस धरलेल्या कोरोना विषाणूचा फटका सोलापूर शहर-ग्रामीणलाही बसला. कोरोनाच्या दोन्ही लाटेत शहर व ग्रामीणमधील दोन लाख 203 व्यक्‍तींना कोरोनाची बाधा झाली. त्यातील चार हजार 966 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. सध्या शहरातील 22 तर ग्रामीणमधील एक हजार 415 रुग्णांवर उपचार सुरु असून उर्वरित सर्व रुग्ण कोरोनामुक्‍त झाले आहेत.

Corona-patient
बार्शी जिल्हा न्यायालयासमोर महिलांचा राडा ! दोन महिलांना अटक

सोलापूर शहरातील पाच्छा पेठेत 12 एप्रिलला पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला. कोरोनाच्या पहिल्या लाटेत ग्रामीणमध्ये दिलासादायक स्थिती होती. मात्र, त्याचवेळी मृत्यूदरात सोलापूर शहर देशातील पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये होते. दुसऱ्या लाटेत मात्र, शहराच्या तुलनेत ग्रामीणमधील परिस्थिती बिकट झाली होती. रुग्णवाढ व मृत्यूदरात सोलापूर ग्रामीण देशातील टॉपटेन जिल्ह्यांमध्ये पोहचले. आता शहरातील कोरोनाची स्थिती सुधारली असून ग्रामीणमध्ये अजूनही अपेक्षित यश मिळालेले नाही.

दरम्यान, आता तिसऱ्या लाटेची शक्‍यता वर्तविली जात आहे. दोन्ही लाटेत हॉटस्पॉट ठरलेले तालुके आणि शहरातील त्या प्रभागांकडे प्रशासनाने आवर्जुन लक्ष देणे गरजेचे आहे. बार्शी, माढा, माळशिरस, पंढरपूर व सांगोला या तालुक्‍यांसह शहरातील 26 पैकी नऊ प्रभागांमधील उपाययोजनांकडे आरोग्य यंत्रणेने वेळीच लक्ष द्यायला हवे.

ऑक्‍सिजन बेड वेळेत मिळाला नाही, रेमडेसिव्हिरचा तुटवडा, असे भरपूर अनुभव प्रशासनाच्या पाठिशी आहेत. तिसऱ्या लाटेत चिमुकल्यांना धोका असल्याचा अंदाज असल्याने त्यांच्यासाठी लागणारी वैद्यकीय उपकरणांची सोय करून ठेवावी लागणार आहे. तिसऱ्या लाटेपूर्वी दोन्ही लाटेतील त्रुटी दूर करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

"हे' प्रभाग ठरले हॉटस्पॉट

प्रभाग  रुग्ण   मृत्यू

3         997    70

6        1344   76

7       1774    88

8       1159    65

15     1513    63

21     1735    71

23      2333   129

24      3543   144

26     1990     86

सर्वाधिक रुग्ण, मृत्यू झालेले तालुके

तालुका      रुग्ण         मृत्यू

पंढरपूर      33,587    629

बार्शी          22,280   501

माळशिरस 33,149   472

मोहोळ       9909      414

माढा          21,834   408

अक्‍कलकोट 4552    205

करमाळा      15,863 210

मंगळवेढा      9,735 191

बाधित पुरुषांची स्थिती...

एकूण पॉझिटिव्ह

1,19,692

पुरुषांचा मृत्यू

3,215

बरे झालेले पुरुष

1,82,407

उपचार घेणारे पुरुष

1,073

बाधित महिलांची स्थिती

एकूण पॉझिटिव्ह

80,511

महिलांचा मृत्यू

1,751

बरे झालेल्या महिला

78,406

उपचार घेणाऱ्या महिला

364

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com