सव्वालाखांवर पुरुष अन्‌ 88 हजारांवर महिला ठरल्या कोरोनाबाधित

जिल्ह्यातील दोन लाख 19 हजार 203 व्यक्‍ती कोरोना बाधित ठरल्या. त्यात एक लाख 30 हजार 844 पुरुष तर 88 हजार 359 महिला आहेत. आतापर्यंत दोन लाख 13 हजार 303 व्यक्‍तींनी कोरोनावर मात केली.
Corona news
Corona newsesakal

सोलापूर : कोरोनाच्या तिन्ही लाटांमध्ये आतापर्यंत जिल्ह्यातील दोन लाख 19 हजार 203 व्यक्‍ती कोरोना बाधित ठरल्या. त्यात एक लाख 30 हजार 844 पुरुष तर 88 हजार 359 महिलांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण बाधितांमधील दोन लाख 13 हजार 303 व्यक्‍तींनी कोरोनावर मात केली. पाच हजार 218 रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. आता कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागला आहे.

Corona news
उन्हाळी सुट्टीतही भरणार शाळा? कोरोनात शाळा बंद राहिल्याने गुणवत्ता घसरली

जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर, अक्‍कलकोट, उत्तर सोलापूर, सांगोला, मंगळवेढा, मोहोळ तालुक्‍यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागला आहे. सध्या ग्रामीणमध्ये 395 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. शहरातील 33 हजार 595 एकूण बाधितांमध्ये 13 हजार 906 महिलांचा समावेश होता. दुसरीकडे ग्रामीणमधील बाधितांमध्ये एक लाख 11 हजार 155 पुरुषांचा तर शहरातील 19 हजार 689 पुरुषांचा समावेश आहे. आतापर्यंत कोरोनामुळे शहरातील एक हजार 502 तर ग्रामीणमधील तीन हजार 716 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रविवारी (ता. 13) शहरात केवळ पाच तर ग्रामीणमध्ये 53 नवीन रुग्ण आढळले. चिंतेची बाब म्हणजे ग्रामीणमधील ओझेवाडी (ता. पंढरपूर) येथील 27 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. नागरिकांनी कोरोना नाही अथवा कोरोना गेला या अविर्भावात न राहता नियमांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे सर्वांनी पालन करावे आणि 15 वर्षांवरील सर्वांनी कोरोनावरील प्रतिबंधित लसीचे दोन्ही डोस टोचून घ्यावेत, असेही आवाहन केले जात आहे. दिलासादायक बाब म्हणजे मागील काही दिवसांत जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा एकही रुग्ण वाढलेला नाही.

Corona news
Covid च्या नव्या व्हेरिएंटचा धूमाकुळ; शास्त्रज्ञांकडून धोक्याची घंटा

कोरोनाची सद्यस्थिती...
एकूण बाधित
2,19,203
आतापर्यंत कोरोनामुक्‍त
2,13,303
एकूण मृत्यू
5,218
सध्या सक्रिय रुग्ण
682

Corona news
मार्चएण्डलाच का वाढतात आगीच्या घटना? 'आग्निशामक'लाही समजेना नेमके कारण

कोरोना बाधितांना तीन महिन्यांनंतरच लस
कोरोना होण्यापूर्वी 15 वर्षांवरील सर्वांनाच लस टोचली जाते. परंतु, कोरोना झाल्यानंतर संबंधित व्यक्‍तीला किमान तीन महिन्यांपर्यंत कोरोनावरील प्रतिबंधित लसीचा डोस टोचता येत नाही. ज्यांना लसीचे दोन्ही डोस घेऊन नऊ महिने पूर्ण झाले आहेत, त्यांना बुस्टर (संरक्षित डोस) डोस टोचला जातो. परंतु, त्याचे प्रमाण खूपच कमी आहे. तिसऱ्या लाटेत तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या अत्यल्प राहिली. तरीही, कोरोना झाल्याने त्यांना लसीचा बुस्टर डोस घेता आलेला नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com