esakal | जिल्ह्यात 20 लाख संशयितांची कोरोना चाचणी ! ग्रामीणमध्ये चिंता कायम
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोना चाचणी

जिल्ह्यात 20 लाख संशयितांची कोरोना चाचणी! ग्रामीणमध्ये चिंता कायम

sakal_logo
By
तात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा

कोरोनाच्या दोन्ही लाटेत आतापर्यंत शहर-ग्रामीणमधील 20 लाख 15 हजार 476 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली.

सोलापूर : कोरोनाच्या (Covid-19) दोन्ही लाटेत आतापर्यंत शहर- ग्रामीणमधील 20 लाख 15 हजार 476 संशयितांची कोरोना चाचणी (Covid Test) करण्यात आली. त्यात एक लाख 71 हजार 477 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून त्यापैकी एक लाख 63 हजार 731 जणांनी कोरोनावर मात केली. मंगळवारी (ता. 20) ग्रामीण भागात 638 रुग्ण आढळले असून सात जणांचा मृत्यू झाला आहे. चिंतेची बाब म्हणजे कडलास (ता. सांगोला) येथील 36 वर्षीय तर कुंभेज (ता. माढा) येथील 40 वर्षीय महिलेचा कोरोनाने बळी घेतला आहे. (Corona was tested on 20 lakh citizens in the district-ssd73)

हेही वाचा: "जबाबदारीने काम करून संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करूया!'

शहरातील कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतरही ग्रामीणमधील रुग्णसंख्या कमी करण्यात प्रशासनाला पूर्णपणे यश मिळालेले नाही. ग्रामीण भागात कोरोना नियम पायदळी तुडवणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. परंतु, कारवाई होत नसल्याने त्यांचा बेशिस्तपणाही वाढल्याचे चित्र आहे. मंगळवारी ग्रामीणमधील अक्‍कलकोट तालुक्‍यात पाच, उत्तर सोलापूर तालुक्‍यात तीन तर दक्षिण सोलापुरात सहा रुग्ण आढळले आहेत. तर मंगळवेढ्यात सर्वाधिक 146, पंढरपूर तालुक्‍यात 133, माढ्यात 81, मोहोळ तालुक्‍यात 72, सांगोल्यात 65, करमाळ्यात 53, मंगळवेढ्यात 28 आणि बार्शीत 43 रुग्ण वाढले आहेत.

हेही वाचा: सीईटीची चिंता नको, सर्वांनाच मिळणार अकरावीला प्रवेश !

तर सोलापूर शहरातील (Solapur City) प्रभाग क्रमांक दहा, 20, 23 आणि 26 मध्ये रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत शहरातील चार लाख 22 हजार 990 तर ग्रामीणमधील 15 लाख 92 हजार 486 संशयितांची कोरोना चाचणी पार पडली. त्यात शहरातील 28 हजार 796 तर ग्रामीणमधील एक लाख 42 हजार 681 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.

कोरोनाची सद्य:स्थिती...

  • एकूण कोरोना चाचण्या : 20,15,476

  • आतापर्यंत पॉझिटिव्ह : 1,71,477

  • कोरोनामुक्‍त रुग्ण : 1,63,731

  • कोरोनाचे बळी : 4,492

  • ऍक्‍टिव्ह रुग्ण : 3,254

म्युकरमायकोसिसचे 85 बळी

शहर-ग्रामीणमधील 599 रुग्णांना म्युकरमायकोसिसची (Mucormycosis) बाधा झाली आहे. त्यापैकी तब्बल 85 रुग्णांचा या आजाराने बळी घेतला आहे. आतापर्यंत 466 रुग्ण त्यातून बरे झाले असून सध्या 48 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. खूप दिवस उपचार घेऊन घरी परतणाऱ्या विशेषत: मधुमेह असणाऱ्यांना या आजाराचा धोका आहे. त्यामुळे संबंधितांनी वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने वेळेत उपचार करून घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

loading image