ट्रेसिंग, टेस्टिंग व ट्रीटमेंटनंतरच थांबेल कोरोना ! शहरात 16 ठिकाणी आढळले नवे 22 रुग्ण 

1Corona_93_0.jpg
1Corona_93_0.jpg
Updated on

सोलापूर : शहरात दररोज एकूण टेस्टच्या तुलनेत पाच ते सहा टक्‍क्‍यांपर्यंत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. आतापर्यंत शहरातील सहा हजार 594 पुरुषांना आणि चार हजार 518 महिलांना कोरोनाची बाधा झाली आहे. दुसरीकडे 401 पुरुषांचा आणि 199 महिला रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आज शहरात 469 संशयितांमध्ये 22 जण पॉझिटिव्ह आले आहेत.

ठळक बाबी... 

  • शहरात आज 469 संशयितांमध्ये 13 पुरुष अन्‌ नऊ महिला पॉझिटिव्ह 
  • आतापर्यंत शहरातील एक लाख 40 हजार 89 संशयितांची झाली कोरोना टेस्ट 
  • शहरात आतापर्यंत आढळले 11 हजार 112 पॉझिटिव्ह; सहाशे रुग्णांचा मृत्यू 
  • रुग्णांच्या संपर्कातील 29 हजार 210 संशयित आतापर्यंत केले होम क्‍वारंटाईन 
  • शहरातील 14 हजार 547 संशयितांना आतापर्यंत इन्स्टिट्यूशनल क्‍वारंटाईनमध्ये ठेवले 

शहरात आज सेटलमेंट फ्री कॉलनी क्र. सहा, हनुमान नगर, तुळजापूर वेस (भवानी पेठ), पी. बी. चौक (बुधवार पेठ), शिवाजी नगर (बाळे), वसंत विहार, नरेंद्र नगर (सैफूल), माशाळ वस्ती (विजयपूर रोड), इंद्रधनू (दमाणी नगर), जवाहर सोसायटी, आंबेडकर नगर (गुरुनानक चौक), सैफूल, मंगळवार पेठ, शिवगंगा नगर (शेळगी) आणि मोदी पोलिस चौकीमागे, या ठिकाणी नव्या रुग्णांची भर पडली आहे. दरम्यान, नागरिकांनी मास्कचा वापर करावा, हात साबव व स्वच्छ पाण्याने धुवावेत, गर्दीत जाणे टाळून सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन महापालिकेचे आयुक्‍त पी. शिवशंकर यांनी केले आहे. दुसरीकडे कोरोनाला हद्दपार करण्याच्या हेतूने ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट वाढविण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Police ASI
The contribution was highlighted during a birth anniversary programme, where speakers recalled his role in power infrastructure and irrigation development.
The programme was organised by Priyadarshini Mahila Vikas Mandal to support pilgrims during the Ashadhi Wari.
Thousands of devotees are expected to participate in the religious celebrations, with special arrangements for devotees including community fasting meals.
Marathi News Esakal
www.esakal.com