esakal | जेवण विकना झालयं...आता काय करावं
sakal

बोलून बातमी शोधा

Bhakri

श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाशेजारी छोटा ढाबा आहे. तिथे गेल्या 20 वर्षांपासून कांता भंडारे या रुग्णांच्या नातेवाइकांसाठी, येणाऱ्या-जाणाऱ्यांसाठी स्वयंपाक बनवत आहेत. भंडारे यांचे वय 40 सुरू आहे. त्यांच्यासोबत आणखीन दोन महिला स्वयंपाक बनवण्यास त्यांना मदत करतात. ढाब्याची वेळ सकाळी आठ ते सायंकाळी 10 वाजेपर्यंत आहे. परंतु त्यांचा कोरोनामुळे स्वयंपाक बनवूनही विकला जात नसल्यामुळे दुपारी तीन वाजता ते बंद करत आहेत.

जेवण विकना झालयं...आता काय करावं

sakal_logo
By
सुस्मिता वडतिले

सोलापूर : रोज सकाळपारी येऊन म्या आणि माझ्या सोबती मिळून स्वयंपाक तयार करतोय... पण कोरोनामुळं पहिल्यासारखं विकना झालय... एक दिस, दोन दिस, तीन दिस जाईल मग तरी गिऱ्हाईक येईल, या आशेने रोज स्वयंपाक तयार करत आहे. तरीपण काही विकनां...तयार स्वयंपाक शिल्लक राहायला लागला. कोरोनामुळे संचारबंदी सुरू आहे. त्यात लॉकडाउन केल्यामुळे व्यवसायावर परिणाम झाला असल्याची व्यथा श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाशेजारील छोट्या ढाब्यावर स्वयंपाक बनवणाऱ्या महिलांनी "सकाळ'कडे मांडली. 

श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाशेजारी छोटा ढाबा आहे. तिथे गेल्या 20 वर्षांपासून कांता भंडारे या रुग्णांच्या नातेवाइकांसाठी, येणाऱ्या-जाणाऱ्यांसाठी स्वयंपाक बनवत आहेत. भंडारे यांचे वय 40 सुरू आहे. त्यांच्यासोबत आणखीन दोन महिला स्वयंपाक बनवण्यास त्यांना मदत करतात. ढाब्याची वेळ सकाळी आठ ते सायंकाळी 10 वाजेपर्यंत आहे. परंतु त्यांचा कोरोनामुळे स्वयंपाक बनवूनही विकला जात नसल्यामुळे दुपारी तीन वाजता ते बंद करत आहेत. नेहमीप्रमाणे भाजी-भाकरी विकत नसल्यामुळे अन्नाची नासाडी होत आहे. सुरवातीपासून भंडारे हे दोन भाज्या, चपाती, भाकरी, भजी, अंडी असे पदार्थ तयार करायच्या. एक भाकरी आणि भाजीची जोड 15 रुपयांस विक्री केली जाते. रोज एक आशा घेऊन येतोय की आज व्यवस्थित गिऱ्हाईक येईल, मागणी वाढेल. परंतु गेल्या काही दिवसांपासून मागणी कमी झाली आहे. वाढत्या उन्हामुळे भरपूर प्रमाणात तयार अन्नाची नासाडी होत आहे. त्यात ढाब्यावर काम करणाऱ्या महिलांनाही पगार द्यावा लागतो. कोरोनामुळे व्यवसाय अडचणीत आला आहे. कसं जगायचं...आम्हाला परवडेना झालयं...घरची परिस्थिती जेमतेम आहे. पोटासाठी जगतोय. त्यात व्यवसाय डबघाईस येत आहे. त्यावेळी 300-400 रुपयांची विक्री व्हायची, परंतु आता एखादा दुसरा गिऱ्हाईक येतो. त्यामुळे सध्या कोरोनामुळे तयार केलेली एक भाजीही विकत नसल्याची व्यथा त्यांनी मांडली. अशा पद्धतीने व्यवसायला अर्थिक झळ पोचल्याचे वास्तव स्वयंपाकवाल्यांनी सांगितले. 
 

loading image
go to top