अर्रार्र ! फेसबूकवर फेकू ताई म्हटल्याने नगरसेविकेने घरी जाऊन बदडले 

1one_20arrested_20for_20threatening_20to_20Married_20woman_20for_20marriage.jpg
1one_20arrested_20for_20threatening_20to_20Married_20woman_20for_20marriage.jpg
Updated on

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विजयपूर रोडवरील भिमाई नगर, कमला नगर, नेहरु नगर या परिसरातील रस्ते, ड्रेनेज येथे सॅनिटायझरची फवारणी केल्याची फेसबूक पोस्ट नगरसेविका अश्‍विनी चव्हाण यांनी टाकली. त्याला उत्तर म्हणून राहूल चंद्रकांत कदम (रा. भिमाई नगर, माशाळ वस्ती) यांनी फेकू ताई, अशी कमेन्ट केली. त्यावर चिडून जाऊन नगरसेविका चव्हाण यांच्यासह पाच जणांनी मिळून कदम यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (ता. 12) घडली. या प्रकरणी विजापूर नाका पोलिसांत सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. 


शहरात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने नगरसेविका अश्‍विनी चव्हाण यांनी फिर्यादी कदम यांच्या घरासमोर जाऊन त्याठिकाणी सॅनिटायझरची फवारणी केल्याची पोस्ट फेसबूकवर शेअर केली. त्यासोबत त्यांनी स्वत:चा फोटोही टाकला होता. मात्र, प्रत्यक्षात तसे काहीच न झाल्याने कदम यांनी त्यांच्या फेसबूकवरील पोस्टला फेकू ताई, असे उत्तर दिले. त्यानंतर नगरसेविका चव्हाण यांनी कदम यांना शोधून त्यांना व त्यांच्या पत्नीस लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. तसेच पत्नीला हाताने तर फिर्यादीच्या डोक्‍यात तलवारीने वार केल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी चेतन चव्हाण, विवेक गमरे उर्फ बाबा, संकल्प चव्हाण, विक्रम राठोड, दर्शन चव्हाण, अश्‍विनी चव्हाण यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक बेंबडे करीत आहेत. 

पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार... 
नेहरू नगर परिसरात राहणाऱ्या नगरसेविका अश्‍विनी चव्हाण यांनी राहूल चंद्रकात कदम (रा. भिमाई नगर, माशाळ वस्ती, विजयपूर रोड) यांच्या घरासमोर कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सॅनिटायझरची फवारणी केल्याचा फोटो फेसबूकवर शेअर केला. भिमाई नगर, कमला नगर, नेहरू नगर येथे ड्रेनेज लाईन, रस्ते स्वच्छ करीत सॅनिटायझरची फवारणी केल्याचेही त्या पोस्टमध्ये नमूद केले होते. त्यांनी त्या पोस्टसोबतच त्यांचा फोटोही जोडला होता. या पोस्टवर राहूल चंद्रकांत कदम यांनी फेकू ताई अशी कमेन्ट केली. त्याला चिडून नगरसेविका अश्‍विनी चव्हाण यांच्यासह अन्य पाच जणांनी राहूल कदम यांना लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. या प्रकरणी कदम यांच्या फिर्यादीनुसार नगरसेविका चव्हाण यांच्यासह सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल झाल्याची माहिती विजापूर नाका पोलिसांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

One Acre Farm to UPSC CAPF Pravin Swami Secures All India Rank 279 and Earns Opportunity for Central Police Service
Teacher payment and e-kyc
CCTV camera
robbery
Marathi News Esakal
www.esakal.com