सोलापुर : तांबोळे खत कारखाना कामगार विषबाधा प्रकरणी तिघा जणाविरोधात गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Poison
सोलापुर : तांबोळे खत कारखाना कामगार विषबाधा प्रकरणी तिघा जणाविरोधात गुन्हा

सोलापूर : तांबोळे खत कारखाना कामगार 'विष'बाधा प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल

तांबोळे : मोहोळ येथील खत निर्मिती कारखान्यातील कामगारांच्या विषबाधा(poisoning) प्रकरणी कंपनीचा मालक व्यवस्थापक व मजूर ठेकेदार या तिघा विरोधात शनिवारी रात्री साडेबारा वाजता मोहोळ पोलिसात (Mohol Police Station)गुन्हा दाखल केला आहे. गणेश रामेश्वर देशमुख रा अकोला तानाजी वसंत काळे रा. तांबोळे रवी जाधव अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

हेही वाचा: बेळगाव : सरकारी पदवीपूर्व महाविद्यालये अतिथी प्राध्यापकांवरच अवलंबून

मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार, मोहोळ ते तांबोळे या रस्त्यावर निर्माण फर्टीलायझर हा खते तयार करण्याचा कारखाना आहे. या कारखान्यात कोळेगाव ता. मोहोळ येथील रेश्मा सचिन जाधव वय 21, पुजा सुरेश शिंदे वय 16, रेखा सुनिल पवार वय 24 ,उषा सचिन पवार वय 22, सुरेखा रवी जाधव वय 27, सपना मिथुन पवार वय 20, सविता युवराज शिंदे वय 12, प्रियांका रवी जाधव वय 16, अंजली विजय पवार वय 20, रेश्मा सुनिल पवार वय 23, कल्पना रमेश शिंदे वय 25, सर्व रा कोरेगाव ता मोहोळ या खत कंपनीत कामगार म्हणून काम करतात.(mohol poisoning case)

हेही वाचा: दुष्काळामुळे शेकडो नौका हर्णै, आंजर्ले किनाऱ्यावर

शुक्रवारी खत निर्मिती कारखान्यात कच्चामाल म्हणून आलेला जिप्सम व इतर कच्चामाल हे कामगार उतरवीत होते. त्याच वेळी वासाने कामगारांना विषबाधा झाली. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना मोहोळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते. कामगारांना उपचारासाठी दाखल केल्यानंतर डॉ गावडे यांनी मोहोळ पोलिसांना ही घटना कळविली. तातडीने पोलीस निरीक्षक अशोक सायकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर खारगे,तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांची चौकशी केली असता, त्यांना चक्कर येणे, ऑक्सिजनची पातळी कमी होणे, उलट्या होणे असा त्रास सुरू होता. त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना ऑक्सीजन सह सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी पाठविले.(Solapur news)

हेही वाचा: खडकवसाला कालव्यातून रब्बीसाठी इंदापूरातील शेतीसाठी पहिले आवर्तन

दरम्यान पोलिसांनी त्यांचा मोर्चा खत कारखान्या कडे वळविला. त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता जिप्सम व अन्य हा पदार्थ मालट्रक मध्ये होता त्यावर फक्त कापड झाकले होते, ते जिप्सम हे कामगार खोर्‍याने उतरवीत होते त्यामुळे त्यांना श्वसनाव्दारे विषबाधा झाली असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान रुग्णालयाला उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांनी भेट दिली.या प्रकरणी हवालदार निलेश देशमुख यांनी फिर्याद दिली असुन तपास पोलीस निरीक्षक अशोक सायकर करीत आहेत.

सोलापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या कामगारांची प्रकृती चांगली आहे त्यांना लावलेला ऑक्सिजन काढला आहे आता त्यांची प्रकृती धोक्याच्या बाहेर आहे.या प्रकरणी चौकशीसाठी कारखान्याचा मालक मजूर आधिकारी यांना बोलाविण्यात आले आहे.

-प्रशांत बेडसे तहसीलदार मोहोळ

जिप्सम हा पदार्थ भूसुधारक म्हणून वापरतात. जमिनीचा सामू वाढला असेल तर त्याचा वापर केला जातो.

-डॉ शरद जाधव शास्त्रज्ञ कृषी विज्ञान केंद्र मोहोळ

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top