क्राईम : व्याज मागितल्याने एकावर सावकारी गुन्हा 

Crime: A criminal offense against one seeking interest
Crime: A criminal offense against one seeking interest
Updated on

सांगोला (सोलापूर) : शेती व घर खर्चास घेतलेली उसनवार रक्कम परत करूनही व्याज व दंडाच्या रकमेपोटी एक लाख रुपये दे म्हणून सातत्याने तगादा लावून एकास शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण केल्याची घटना महूद (ता. सांगोला) येथे घडली. याप्रकरणी सांगोला पोलिस ठाण्यात सावकारीचा गुन्हा दाखल झाला आहे.


व्याजदराने घेतले 25 हजार 
राहुल रामचंद्र पवार (रा. गायगव्हाण, ता. सांगोला) याने शंकर शिवाजी पाटील (रा. पवारवाडी, महूद, ता. सांगोला) यांच्याकडून 40 टक्के व्याजदराने 25 हजार रुपये घेतले होते. या रकमेपोटी प्रत्येक आठवड्याला शंकर पाटील यांना 2500 रुपये व्याज म्हणून पोहोच केले होते. फिर्यादी राहुल पवार यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या 10 शेळ्या विकून आलेल्या रकमेतील 25 हजार रुपये समाधान जुगदार यांच्या समक्ष शंकर पाटील यांना परत केले होते. घेतलेली पूर्ण रक्कम व व्याज शंकर पाटील यांना देऊनही व्याज व दंडाची रक्कम म्हणून मला अणखी एक लाख रुपये दे म्हणून शंकर पाटील यांनी वारंवार मोबाईलद्वारे राहुल पवार यास शिवीगाळ व दमदाटी केली होती. यानुसार सांगोला पोलिस ठाण्यात सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 

अत्याचारप्रकरणी एकास अटक 
बार्शी : आई - वडील मोलमजुरी करण्यास बाहेर गेले असताना तरुणाने बळजबरीने मारहाण करून शालेय अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार केला. बार्शी शहर पोलिसांत बाललैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला. मोहसीन पठाण गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पीडित मुलीच्या पालकांनी फिर्याद दाखल केली. ही घटना आज घडली. 

हेही वाचा - महिला दिन विशेष : ती देतेय आरोग्यदायी जिवनाचे धडे 

दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू 
मंगळवेढा : दुचाकी वेगाने चालवून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना मंगळवेढा ते कारखाना रस्त्यावर अवताडे सूत मिल वळणावर घडली. रूपेश शिंदे याने त्याच्या ताब्यातील स्कुटी दुचाकी वेगाने चालवून तानाजी सिद्धेश्‍वर नागणे (रा. चांभार गल्ली) चालवित असलेल्या ड्रीम योगा दुचाकीला धडक दिली. यात तानाजी नागणे गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्याने रूपेश शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 

मंगळवेढ्यात चौघांकडून फिर्यादस मारहाण 
मंगळवेढा : पंढरपूर न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यांमध्ये वेळेवर सक्‍सेस का हजर राहत नाही असे विचारत तुझ्यामुळे केस लांब पडत आहे म्हणून चौघांनी मारहाण व शिवीगाळ करून मारहाण केल्याची फिर्याद पांडुरंग विठोबा लवटे (रा. खुपसंगी) यांनी दिली. ही घटना काल खुपसंगी ते आंधळगाव रोडवरील लवटेवस्ती येथे घडली असून यामध्ये दिनेश सिताराम लेंगरे, बिरा अण्णा लवटे, कुशाबा नारायण पडवळे, अंकुश उर्फ तुकाराम राजाराम पडोळे (सर्वजण रा. खुपसंगी) येथील असून त्यांनी फिर्यादीस पंढरपूर जिल्हा न्यायालयातील खटल्यात हजर का राहत नाही, केवळ तुझ्यामुळे केस लांबणीवर पडत आहे आणि नातेवाईकांच्या बाजूने साक्ष देण्यासाठी अंकुश पडवळे यांनी हातातील लोखंडी रॉडच्या साह्याने हातावर, पाठीवर मारहाण करून गळ्यातील सोन्याची चैन काढून घेतली. तीन संशयित आरोपींनी फिर्यादीस लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. "ज्याप्रमाणे तुझ्या वडीलास मारले, त्याप्रमाणे तुलाही मारू,'अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sina Madha Water Scheme Demand Grows as Tulshi Villagers Begin Hunger Strike for Inclusion and Irrigation Water
Pandharpur Gets 493 Crore Road Development Package Ring Road and 9 Roads Approved With Two New Bridges
Laxman Hake Y Plus Security Under Fire as Mahesh Dongre Patil Gives Government 15 Days Before High Court Action
Young Woman Taken to Lodge and Allegedly Assaulted Man Booked After Blackmailing Her for Gold Chain and Money
Marathi News Esakal
www.esakal.com