Solapur Crime : हवेत गोळीबार करून जीवे मारण्याची धमकी

मोटारसायकलने धक्का दिल्याचा जाब विचारण्यावरून बेंबळेत एकास मारहाण
crime man beaten for asking being hit by motorcycle Threatening to shoot solapur
crime man beaten for asking being hit by motorcycle Threatening to shoot solapuresakal

टेंभुर्णी : लहान मुलास मोटारसायकलने धक्का दिल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून शिवीगाळ, दमदाटी व कोयत्याने मारहाण करून जखमी केले. यानंतर त्याच ठिकाणी पुन्हा येऊन पिस्तूलमधून हवेत एक गोळी झाडून दोघांवर पिस्तूल रोखून धरले व जीवे मारण्याची धमकी दिली.

ही घटना बेंबळे (ता. माढा) येथे शनिवारी रात्री पावणेआठच्या सुमारास घडली. या प्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, चौघा संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. एक फरार आहे.

याप्रकरणी शरद रामचंद्र कोळी (वय ३५, रा. बेंबळे) यांनी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, शंकर लक्ष्मण कांबळे (वय २५), वैभव नामदेव कांबळे (वय १९), सोमनाथ भारत कांबळे (वय २०, रा. सर्वजण बेंबळे) यांना पोलिसांनी अटक केली आहे. एकजण फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

शनिवारी रात्री पावणेआठच्या सुमारास बेंबळे येथील वेताळवाडी चौकात फिर्यादी शरद कोळी हे मुलगा रुद्र याला मोटारसायकलने धक्का का दिला, अशी विचारणा सोमनाथ कांबळे यास केली असता सोमनाथने चिडून जाऊन शिवीगाळ, दमदाटी करून कोयत्याने मारहाण करून किरकोळ जखमी केले. यावेळी भैय्या सुनील ताकतोडे, शंकर लक्ष्मण कांबळे, वैभव नामदेव कांबळे व एका अल्पवयीन मुलाने शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

त्यानंतर थोड्यावेळाने त्याच ठिकाणी सोमनाथ कांबळे व त्याचा चुलत भाऊ शंकर कांबळे या दोघांनी येऊन शंकर कांबळे याने हातातील पिस्तूलमधून एक गोळी हवेत झाडली व भांडण सोडविणारे फिर्यादीचे चुलतभाऊ गणपत कुर्मदास कोळी व रावसाहेब दत्तात्रय कोळी यांच्यावर पिस्तूल रोखून त्याचा धाक दाखवून त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली. नंतर त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली.

या घटनेची फिर्याद दाखल होताच उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. विशाल हिरे, टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक गिरीश जोग, गुन्हे अन्वेषण पथकातील पोलिस उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के, पोलिस नाईक विनोद साठे, संजय भानवसे, हवालदार अक्षय कांबळे, तुकाराम माने देशमुख, गणेश इंगोले, संजय क्षीरसागर, राजेंद्र खंडागळे यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे या गुन्ह्यातील सोमनाथ कांबळे, शंकर कांबळे, वैभव कांबळे व एक अल्पवयीन मुलास पकडले. सोमवारी या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. सहायक पोलिस निरीक्षक गिरीश जोग तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com