विष प्राशन करून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न ! वाचा सोलापुरातील गुन्हे वृत्त 

Solapur_Crime
Solapur_Crime
Updated on

सोलापूर : विजापूर रोडवरील निर्मिती विहार येथे राहणाऱ्या कुमार मल्लिकार्जुन बनसोडे (वय 27) या तरुणाने राहत्या घरी रागाच्या भरात विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. बनसोडे यास त्रास होऊ लागल्यावर त्याचा मामा रमेश शिंगे यांनी त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. 

गरम तेल अंगावर पडून तरुण जखमी 
गॅसवरील गरम तेल अंगावर पडून तरुण जखमी झाला. बस्सू सिध्दू जाधव (वय 27, रा. केशेगाव, ता. तुळजापूर) असे जखमी तरुणाचे नाव असून त्याच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. 

चक्‍कर आल्याने गरम पाणी पडून वृद्ध जखमी 
चक्‍कर आल्याने गरम पाणी अंगावर पडून माथाबाई मधुकर चव्हाण (वय 65, रा. टाकळी सिंकदर, ता. मोहोळ) ही वृध्द महिला अंग भाजून जखमी झाली. त्यांना मुलगा विजय चव्हाण याने उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. 

तरुणास मारहाण केल्याने जखमी 
माझ्या बायकोला घेऊन गाडीवर कुठे गेला होतास असे विचारणाऱ्या संजय जेटींग म्हात्रे (वय 28, रा. सिंदखेड आहेरवाडी, ता. दक्षिण सोलापूर) यास दत्ता पाटील व महांतेश पाटील या दोघांनी लाथाबुक्‍क्‍याने मारहाण केली. यामध्ये म्हात्रे याच्या सर्वांगास मुका मार लागल्याने त्यास उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shaktipeeth Highway Protest raju shetti in solapur
Devotees Shocked in Pandharpur After Claims of Paid Vithal Darshan Surface
Cattle Transport Truck Meets With Accident in Solapur’s Mohol Taluka
ATM Pulled Out and Fled in Car; Major Theft Incident Shocks Solapur
Marathi News Esakal
www.esakal.com