फसवणूक करून जागा स्वत:च्या नावावर करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा ! 

Solapur_Crime
Solapur_Crime
Updated on

सोलापूर : फसवणूक करून जागा नावावर लावून घेणाऱ्या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नागेश शंकर पवार (वय 53, रा. कलावती नगर भाग 2, सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इस्माईल रुकमोद्दीन आत्तार (रा. सिद्धेश्‍वर पेठ, सोलापूर) आणि नागनाथ दशरथ पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नागेश पवार यांच्या जागेच्या ठरलेल्या 6 लाख रुपयांपैकी 4 लाख रुपये दिल्याची खोटी सही असलेली व्यवहार पावती इस्माईल आत्तार व नागनाथ पवार यांनी दाखल करून नागेश पवार यांची जागा आपल्या नावावर करून त्यांची फसवणूक केली. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक धनवे तपास करीत आहेत. 

वृद्धाला मारहाण करून चेन चोरली 
फौजदार चावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आयुर्वेदिक चौकीजवळ वृद्ध इसमास मारहाण करून त्याच्याकडील 37 हजार रुपये किमतीचा ऐवज लुटून नेल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मारुती गुंडीबा बनसोडे (वय 67, रा. बुधवार पेठ, जय मल्हार चौक, सोलापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. 

मारुती बनसोडे हे बुधवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास आयुर्वेदिक कॉलेज ते पोलिस चौकी या दरम्यान दूध आणण्यासाठी दुचाकीवरून गेले होते. त्या वेळी अनोळखी तीन व्यक्तींनी बनसोडे यांना जबर मारहाण करून त्यांच्याकडील सोन्याची चेन व रोख 2 हजार रुपये असा 37 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला. या प्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक देशमाने तपास करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shaktipeeth Highway Protest raju shetti in solapur
Devotees Shocked in Pandharpur After Claims of Paid Vithal Darshan Surface
Cattle Transport Truck Meets With Accident in Solapur’s Mohol Taluka
ATM Pulled Out and Fled in Car; Major Theft Incident Shocks Solapur
Marathi News Esakal
www.esakal.com