मजरेवाडी येथे दोन गटांत हाणामारी ! वाचा सोलापुरातील गुन्हे वृत्त 

Solapur_Crime
Solapur_Crime
Updated on

सोलापूर : मजरेवाडी येथील टिळक नगर येथे दोन गटांत हाणामारी होऊन एमआयडीसी पोलिस ठाण्यात 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस शिपाई नसरुद्दीन बागवान यांच्या फिर्यादीवरून ऋषिकेश चौगुले, सद्दाम नाईकवाडी, वैभव वैरागकर, शुभम ताकमोगे, अलफहद नागूर, समीर मुल्ला, बब्बू व त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौगुले व मुल्ला यांच्या गटात लाकडी वासे, कोयत्याने हाणामारी झाली अशी नोंद पोलिसांकडे करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक पेटकर तपास करीत आहेत. 

चोरट्याने पळवले बोकड व शेळ्या 
दमाणी नगर परिसरातील गडदर्शन येथून चोरट्याने 50 हजार रुपयांच्या शेळ्या व बोकडांची चोरी केली. याबबात दत्तात्रय वसंत जावळे (वय 31) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जावळे यांच्या घरासमोरील पत्रा शेडमधून चोरट्याने बोकड व शेळ्या चोरून नेल्या. हवालदार शेख तपास करीत आहेत. 

अपघातात रिक्षाचालकाचा मृत्यू 
अज्ञात वाहनाच्या धडकेने येलप्पा बाबू केंगार (वय 40, रा. गरिबी हटाव झोपडपट्टी नं. 2, सोलापूर) या रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी सकाळच्या सुमारास झाला. केंगार हे त्यांची एमएच 13 सीटी 1893 क्रमांकाची रिक्षा घेऊन हत्तूर गावाकडे निघाले होते. त्यावेळी चौत्रा विजापूर नाका येथे अज्ञात वाहनाने रिक्षाला जोरदार धडक दिली. यामध्ये केंगार हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना बेशुद्धावस्थेत विजापूर नाका पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वीच केंगार यांचा मृत्यू झाला. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. 

एकास लाकडाने मारहाण 
घरगुती कारणावरून सारंग राजाराम निकम (वय 48, रा. सोहाळे, ता. मोहोळ) यास संतोष निकम याने लाकडाने जबर मारहाण केली. यामध्ये सारंग निकम यांच्या डोक्‍यास मार लागल्याने त्यांना उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. 

आत्महत्येचा प्रयत्न 
शेतीमध्ये जमिनीच्या वादातून सीताराम धर्मराज जाधव (वय 35, रा. चिकली, ता. मोहोळ) या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. जाधव यास त्रास होऊ लागल्यावर उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबबात सिव्हिल पोलिस चौकीत नोंद करण्यात आली आहे. 

दुकान फोडून 41 हजारांची चोरी 
अक्‍कलकोट रोडवरील ताना-बाना शोरूमशेजारील हेअर अफेअर कटिंग व पार्लरचे दुकान फोडून चोरट्यांनी 41 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत जेलरोड पोलिस ठाण्यात रवी मनोहर गोगी (वय 36, रा. हरीकृष्ण विहार, मंत्रीचंडक पार्क, सोलापूर) यांनी फिर्याद दाखल केली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक क्षीरसागर तपास करीत आहेत. 

मजरेवाडी येथे हाणामारी 
मजरेवाडी येथील टिळक नगर येथे दोन गटांत हाणामारी होऊन एमआयडीसी पोलिस ठाण्यात 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस शिपाई नसरुद्दीन बागवान यांच्या फिर्यादीवरून ऋषिकेश चौगुले, सद्दाम नाईकवाडी, वैभव वैरागकर, शुभम ताकमोगे, अलफहद नागूर, समीर मुल्ला, बब्बू व त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चौगुले व मुल्ला यांच्या गटात लाकडी वासे, कोयत्याने हाणामारी झाली अशी नोंद पोलिसांकडे करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक पेटकर तपास करीत आहेत. 

संजीव नगरात घरफोडी 
संजीव नगरात राहणाऱ्या मोहम्मद सादीक ताडपत्री (वय 55) यांच्या बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने 50 हजार रुपयांच सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ताडपत्री हे मुलांची शाळा सुरू झाल्याने लोणी काळभोर, पुणे येथे घराला कुलूप लावून गेले होते. त्यावेळी चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरातून सोन्याच्या अंगठ्या, चांदीचे पैंजण, चांदीची चैन व रोख रक्‍कम असा 48 हजार 900 रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची नोंद पोलिसांकडे करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक खांडेकर तपास करीत आहेत. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Shaktipeeth Highway Protest raju shetti in solapur
Devotees Shocked in Pandharpur After Claims of Paid Vithal Darshan Surface
Cattle Transport Truck Meets With Accident in Solapur’s Mohol Taluka
ATM Pulled Out and Fled in Car; Major Theft Incident Shocks Solapur
Marathi News Esakal
www.esakal.com