Crime News : थेट तहसील दारांनाच मागितली खंडणी; दोघांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News  Extortion demanded directly from Tehsil Dar crime against two police solapur

Crime News : थेट तहसील दारांनाच मागितली खंडणी; दोघांवर गुन्हा

मोहोळ : तालुक्यातील अवैध्यरीत्या गौण खनीज माफियावर तसेच बालाजी अमाईन्स कंपनी वर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देत सोशल मिडीयावर बदनामी केली तसेच मोहोळचे तहसीलदार यांना ५० हजाराची खंडणी मागून त्या पैकी आठ हजार रुपये रोख रक्कम कार्यालयातच स्विकारताना प्रहार संघटनेचा मोहोळ तालुका अध्यक्ष वैभव जावळे रा शिरापूर ता मोहोळ याला रंगेहात पोलिसांनी पकडले.

त्याच्यावर खंडणी व शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला.अटक करून जावळे याला पोलीसांनी मोहोळच्या न्यायालया समोर उभे केले असता सोमवार पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. या बाबत पोलीसा कडुन मिळालेली माहीती अशी की, गौण खनीजाची रॉयल्टी महसुल बुडवून तसेच चिचोली-काटी औध्योगीक वसहातील बालाजी अमाईन्स कंपनीने बेकायदा शासनाचा महसुल बुडवुन गौण खनीज नेली जाते, त्याच्या वर कारवाई का करीत नाही असा जाब तहसीलदार यांना विचारला तेव्हा तहसीलदार यांनी तुम्हाला जी माहीती हवी आहे ती माहीती माहीतीच्या अधिकारात मागुन घ्या असे सांगीतले.

तेव्हा प्रहारचे शहराध्यक्ष अजित कुलकणी यांना फोन करून तहसीलदार याना ५० हजार रू जावळे जवळ ध्या असे म्हटले. पैसे न दिल्याने गेल्या दोन महीन्या पासुन विविध न्युज पोल्टरवर बदनामी च्या बातम्या देत होते. वारंवार कार्यालयात येऊन पैशाची मागणी करत होते. त्याला वैतागुन ता २३ रोजी सकाळी १० वा वैभव जावळे याने पुन्हा पैशाची मागणी केली. सातत्याने पैशाची मागणी करीत व महसुल कार्यालयाची बदनामी करीत शासकीय कामात सारखाच अडथळा निर्माण करीत होता. तहसीलदार याना व्हॉटसप वर मेसेज देखील केला होता.

ता २३ रोजी सकाळी १०.३० वा तहसील कार्यालय येथे जावळे पुन्हा आला. दरम्यान वारंवार शासकीय कामात अडथळा आणुन कार्यालयाची सोशल मिडीयावर बदनामी झाल्यामुळे वैतागलेल्या तहसीलदार प्रशांत बेडसे यानी पोलीसांना ही माहीती दिली व आणी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यास सांगीतले. वैभव जावळे हा शुक्रवारी पुन्हा सायंकाळी ५ च्या दरम्यान आला व ३० हजार रुपयांची मागणी केली. हे पैसे दुसऱ्या कोणाकडे तरी द्या असे म्हणाला. तेव्हा कार्यालयातील लिपीक अडगळे यांच्या जवळ ८ हजार रुपये दिले आहेत ते घे म्हणाल्यावर तो पलीकडे कार्यालयात गेला तेथे २०० रु च्या ४० नोटा स्विकारताना अध्यक्ष वैभव जावळे याला साध्या वेषातील पोलीसांनी पकडले.

जावळे व कुलकर्णी या दोघांनी खंडणी मागितल्याची फिर्याद तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी पोलीसात दाखल केली. पोलीसांनी खंडणीचा गुन्हा दाखल करून रात्री ११ वाजता वैभव जावळे याला अटक केली. शनिवार ता २४ रोजी मोहोळच्या न्यायालया समोर उभे करण्यात आले तेव्हा सोमवार पर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला.या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजकुमार डुणगे करीत आहेत.

टॅग्स :Solapurpolicecrimeransom