
भीमानगर : भीमा नदीकाठीलगत असणाऱ्या टणू-टाकळी (टें) बंधाऱ्यामध्ये मगरीचा संचार वाढल्याने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. रविवारी रात्री मगर बंधाऱ्यात फिरताना दिसून आली. काही महिन्यापूर्वी आलेगाव खुर्द येथे भीमा नदीत मगर दिसली होती. आता टाकळी (टें) टणू बंधारा येथे पुन्हा भीमा नदीत शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाकडून तातडीने स्थळाची पाहणी करण्यात आली असून, ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहेत.