A revenue servant in Akkalkot has been booked following allegations of demanding money from farmers for crop inspections.
esakal
अक्कलकोट शहर : शासनाच्या आदेशानुसार शेतातील पिकांची पाहणी विनाशुल्क करणे अपेक्षित असताना, पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांकडे २०० ते ५०० रुपयांची मागणी केल्याच्या आरोपावरून खैराट (ता. अक्कलकोट) येथील महसूल सेवक हनुमंत सुरेश जाधव याच्याविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.