
जिल्ह्यातील १.९५ लाख शेतकऱ्यांनी भरला पीकविमा
सोलापूर - प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप-२०२२ या योजनेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ९५ हजार ५८३ शेतकऱ्यांनी पीक विमा भरला आहे. यंदाच्या खरिपासाठी एक लाख २९ हजार २५६ हेक्टरवरील पिकांना विम्याचे संरक्षण मिळाले आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे म्हणाले, जिल्ह्यातील १५ कर्जदार शेतकऱ्यांनी व एक लाख ९५ हजार ५६८ बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप विमा योजनेत सहभाग घेतला आहे. शेतकऱ्यांना विमा योजनेच्या माध्यमातून ६१८ कोटी रुपयांचे संरक्षण मिळणार आहे. विम्याच्या हप्त्यापोटी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १२ कोटी ५६ लाख रुपये जमा केले आहेत
यंदाच्या खरीप विमा योजनेत राज्य हिस्सा म्हणून शासनाने ५३ कोटी ६१ लाख रुपये जमा केले आहेत. केंद्र हिस्सा म्हणून शासनाने ५३ कोटी ६१ लाख जमा केले आहेत. शेतकरी, राज्य हिस्सा आणि केंद्र हिस्सा असा एकूण सोलापूर जिल्ह्यासाठी ११९ कोटी ७७ लाख रुपयांचा विमा उतरवण्यात आला आहे. २०२१ च्या खरीप हंगामामध्ये सोलापूर जिल्ह्यातून दोन लाख २२ हजार ४१२ शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेसाठी अर्ज केले होते. २०२१ च्या तुलनेत यंदा ८७.९४ टक्के शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप-२०२२ मध्ये सहभाग घेतला आहे.
Web Title: Crop Insurance Was Paid By 195 Lakh Farmers In Solapur District
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..