Solapur Weather : वाढत्या उन्हामुळे जमीनिची मशागती आता रात्री

दररोजच्या वाढत्या उन्हामुळे मोहोळ तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतीच्या मशागतीच्या वेळा बदलल्या असून, नांगरट कुळवणी रोटरनी ही ट्रॅक्टरच्या सहाय्याने करण्यात येणारी कामे पहाटे पासून सकाळी दहा वाजे पर्यंत व रात्री पासून पहाटे पर्यंत करण्यात येत आहेत.
Solapur Weather
Solapur Weathersakal

-राजकुमार शहा

मोहोळ : दररोजच्या वाढत्या उन्हामुळे मोहोळ तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतीच्या मशागतीच्या वेळा बदलल्या असून, नांगरट कुळवणी रोटरनी ही ट्रॅक्टरच्या सहाय्याने करण्यात येणारी कामे पहाटे पासून सकाळी दहा वाजे पर्यंत व रात्री पासून पहाटे पर्यंत करण्यात येत आहेत.

सध्या उन्हाचा पारा वरचेवर वाढत आहे. सध्याच्या मे महिन्यात तर सर्वात जास्त उन्हाचा असतो. ग्रामीण भागात ज्वारी, मका, ऊस, गहू, हरभरा या पिकांची काढणी झाल्या नंतर नांगरट करावी लागते. तसेच ज्या शेतकऱ्याला थोडेफार पाणी आहे तो थोड्या दिवसात येणारी पिके करतो. सध्या बैलांची संख्या अत्यल्प आहे. गावात एखादीच बैल जोडी राहिली आहे. नवीन पीक करावयाचे म्हणल्यावर नांगरट रोटरनी या मशागती कराव्या लागतात. कडक उन्हामुळे लहान असो वा मोठा ट्रॅक्टरचे इंजिन अत्यंत गरम होते, त्यामुळे ते नादुरुस्त होण्याची शक्यता जास्त असते.

ठिबक सिंचनाद्वारे पिकाला पाणी देताना ही ते रात्रीच द्यावे लागते. कडक उन्हात पाणी दिले तर ते पिकाच्या मुळ्या पर्यंत जायला वेळ लागतो, मुळ्या गरम झाल्या असल्याने पिकाची वाढ खुंटते. त्यामुळे पाणी देण्या साठी ही रात्रीचीच वेळ निवडावी लागते. सध्या डाळिंब, पेरू ही पीके काढणी योग्य झाली आहेत. उन्हामुळे त्यांच्यावर चट्टे पडतात, त्यामुळे बाजारात त्याची विक्री कमी दरात होते.

त्यामुळे खराब झालेल्या साड्या,प्रोटॅक्शन कव्हर यांचा ती पिके झाकण्यासाठी उपयोग प्राधान्याने केला जातो. मजुरांच्या कामाच्या वेळाही बदलल्या आहेत. सकाळी सात ते दुपारी एक वाजे पर्यंत सहा तासानंतर त्यांना सुट्टी देण्यात येते. एकुण परिस्थीती पाहिली तर कडक उन्हामुळे शेतीच्या कामाचे कालचक्रच बदलले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com