esakal | Solapur | शहरात ३० ऑक्‍टोबरपर्यंत जमावबंदी
sakal

बोलून बातमी शोधा

सावधान ! आजपासून 30ऑक्‍टोबरपर्यंत सोलापूर शहरात जमावबंदी

सोलापूर : शहरात ३० ऑक्‍टोबरपर्यंत जमावबंदी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही पूर्णपणे संपलेला नसून तिसऱ्या लाटेची शक्‍यता आहे. त्यामुळे १६ ते ३० ऑक्‍टोबर या कालावधीत संपूर्ण शहरात जमावबंदीचे आदेश लागू असतील, असे परिपत्रक पोलिस आयुक्‍तालयाने आज काढले आहे. या कालावधीत पाच तथा पाचपेक्षा अधिक व्यक्‍तींना एकत्रित फिरण्यास बंदी असेल, असेही त्या आदेशातून स्पष्ट करण्यात आले आहे. गर्दी टाळण्यासाठी कोजागरी पौर्णिमा व ईद-ए-मिलादच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

सोलापूर शहराची ओळख धार्मिक सण, उत्सव, महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी करणारे म्हणून महाराष्ट्रात आहे. शहरात लहान-मोठ्या कारणांवरून सभा, संप, आंदोलने, निदर्शने होतात. नवरात्रोत्सवाच्या शेवटी १५ ऑक्‍टोबरला (शुक्रवारी) दसरा असून १९ ऑक्‍टोबर रोजी कोजागरी पौर्णिमा व ईद-ए-मिलादचा सण आहे.

हेही वाचा: सोलापूर-विजयपूर मार्ग 20 ऑक्‍टोबरपर्यंत बंद ! कंबर तलावाजवळील रेल्वे ब्रिजखाली ड्रेनेज टाकण्याचे काम 

त्यावेळी शहरात ठिकठिकाणी गर्दी होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. गर्दीतून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, सार्वजनिक हितास धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे ३० ऑक्‍टोबरपर्यंत शहरात मिरवणूक काढण्यास अथवा सभा घेण्यावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. दुसरीकडे पाच अथवा त्याहून अधिक व्यक्‍तींनी एकत्रित फिरू नये, असे आवाहन पोलिस उपायुक्‍त बापू बांगर यांनी त्यांच्या आदेशातून स्पष्ट केले आहे. तत्पूर्वी, हत्यारे, शस्त्रे अशा इजा होणारे साहित्य जवळ बाळगू नये, सोशल मिडियातून कोणीही अफवा पसरवू नये, प्रतिकात्मक पुतळा घेऊन आंदोलने करू नयेत, असेही त्यांनी आदेशात म्हटले आहे.

loading image
go to top