डबेवाल्याला पोलिस निरीक्षकाची मारहाण ! वॉचमनचा जबाब घेऊन तयार होणार मारहाणीचा रिपोर्ट

Police Cap
Police Cap
Updated on

सोलापूर : ग्रामीण पोलिस मुख्यालयात डबा घेऊन गेलेल्या डबेवाल्याला पोलिस निरीक्षकांनी मारहाण केल्याचा अहवाल तपास अधिकारी पोलिस उपायुक्‍त डॉ. दीपाली धाटे यांनी तयार केला आहे. गेटवरील सुरक्षारक्षकाचा जबाब घेऊन तो अहवाल पोलिस आयुक्‍तांकडे पाठविला जाणार आहे. त्यानंतर आयुक्‍तांच्या माध्यमातून या प्रकरणावरील कारवाई केली जाणार आहे. 

मटनाचा डबा का आणला नाही, या कारणावरून मला मारहाण केली. पोलिसांत गेल्यास खोट्या गुन्ह्यात अडकवितो, असा दम देण्यात आला. त्या पोलिस निरीक्षकापासून माझ्या कुटुंबासह मला धोका आहे, अशी लेखी तक्रार डबेवाला विजय रावसाहेब घोलप यांनी पोलिस आयुक्‍त अंकुश शिंदे यांच्याकडे केली होती. त्यानंतर आयुक्‍तांनी डॉ. धाटे यांच्या माध्यमातून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल देण्यासंदर्भात आदेश दिले होते. त्यानुसार डॉ. धाटे यांनी सोलापूर ग्रामीण पोलिस मुख्यालयातील मारहाण करणाऱ्या पोलिस निरीक्षकाच्या रूमशेजारी राहणाऱ्या दोन पोलिस निरीक्षक व दोन उपनिरीक्षकांसह संबंधित पोलिस निरीक्षक श्री. शिंदे व त्यांच्या रूममधील पोलिस कर्मचाऱ्याचा जबाब घेतला आहे. दुसरीकडे, घोलप यांनाही बोलावून त्यांच्याकडून लेखी जबाब घेण्यात आला आहे. हे भांडण होण्यामागचे कारण स्पष्ट झाले असून, आता मुख्यालयाच्या गेटवरील सुरक्षारक्षकाचा जबाब घेणे बाकी आहे. त्यानंतर अहवालाच्या आधारे पोलिस आयुक्‍त पुढील कारवाई करतील, असे डॉ. धाटे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

दोघांमध्ये काही दिवसांपासून सुरू होती कुजबूज 
सिव्हिल हॉस्पिटल, सोलापूर ग्रामीण पोलिस मुख्यालयासह शहरातील अन्य ठिकाणी डबे पोच करण्याचा व्यवसाय विजय घोलप यांचा आहे. मागील कित्येक वर्षांपासून त्यांचा हा व्यवसाय सुरू आहे. दुसरीकडे, मुख्यालयातील पोलिस निरीक्षक श्री. शिंदे हे स्वत: त्यांच्याकडून डबा घेतात. मात्र, काही दिवसांपासून त्यांच्यात कोणत्यातरी कारणावरून शाब्दिक वाद होत होते, असे जबाब देणाऱ्यांनी सांगितले. त्या दोघांमध्ये वाद होण्याच्या कारणांचाही शोध डॉ. धाटे यांनी घेतला आहे. चौकशी अहवाल अंतिम झाल्यानंतर त्याबाबत सत्य बाहेर येणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Semi-Constructed Water Tank Poses Severe Threat to Students
Solapur Hotgi Lake IT Park Project To Get 35 Acres Land As 12 Acres Will Be Reserved For Infrastructure Facilities
Railway Project
Solapur ZP School
Marathi News Esakal
www.esakal.com