दामाजी कारखान्यास गत वैभव मिळवून देणार - शिवानंद पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivanand Patil

संत दामाजी साखर कारखान्याची 2021-22 या आर्थिक वर्षाची अधिमंडळाची 34 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कार्यस्थळावर संपन्न झाली.

दामाजी कारखान्यास गत वैभव मिळवून देणार - शिवानंद पाटील

मंगळवेढा - दामाजी कारखान्यास मारवाडी वकिलाच्या काळातील वैभव प्राप्त करुन देण्याचा प्रयत्न करताना 198 कोटी रुपयाचे कर्ज या संस्थेवर मागील संचालक मंडळाने करुन ठेवले असून, प्रस्तावित डिस्टिलरी प्रकल्पाची सुनावणी 18 ऑक्टोबरला होणार असुन तो प्रकल्प पुर्ण करणेसाठी संचालक मंडळ पाठपुरावा करीत असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी व्यक्त केले.

संत दामाजी साखर कारखान्याची 2021-22 या आर्थिक वर्षाची अधिमंडळाची 34 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कार्यस्थळावर संपन्न झाली. तत्पूर्वी स्व. कि. रा. मर्दा, स्व. रतनचंद शहा, संत दामाजीपंत-श्री विठ्ठल पंत यांच्या प्रतिमेचे पुजन उपस्थित मान्यवरांचे शुभहस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, येणा-या गळीत हंगामातील उत्पादीत साखर, मोलासेसवर देखील अॅडव्हान्स उचल केली आहे. त्यावेळी 3 लाख शिल्लकेवर संचालक मंडळ सत्तेवर आले. जेष्ठ कनिष्ठ नेत्याचे मार्गदर्शन व सहकार्याने हे संचालक मंडळ काम करीत आहे. शेतक-यांची ऊस बिले अदा केली असून एफ. आर. पी. ची राहिलेली 111/- गळीत हंगाम सुरु करण्याच्या अगोदर अदा करण्याचा प्रयत्न करताना या गळीत हंगामामध्ये ६ लाख मे. टन गाळप करण्याचे ध्येय संचालक मंडळाने ठेवले. या संचालक मंडळाने सभासदत्व खुले ठेवल्याने 8100 नवीन सभासद झाले. विषयपत्रिकेवरील विषयांचे वाचन कार्यकारी संचालक सुनिल दळवी यांनी केले. विषयपत्रिकेवरील विषयातील आर्थिक बाबींची व लेखा परिक्षण अहवालातील दोषांची कायदेशिर जबाबदारी तत्कालीन संचालक मंडळावर ठेवुन वृत्तांत कायम मंजूर करण्यात आले.

अध्यक्ष शिवानंद पाटील व संचालक मंडळाने दोन महिन्याचे कालावधीत केलेल्या कामकाजामध्ये ऊस बिले, तोडणी वाहतुक बिले, कर्मचाय्रांचा पगार केल्याबध्दल व मांगील संचालक मंडळाचे कालावधीतील सहा वर्षाचे लेखापरिक्षण नवीन लेखा परिक्षकांकडून करुन घेण्याची सुचना अजित जगताप यांनी मांडली यावे. यावेळी धनश्री परिवाराचे शिवाजीराव काळुंगे, अॅड. नंदकुमार पवार, यादाप्पा माळी, लतीफ तांबोळी, अजित जगताप, उपाध्यक्ष तानाजी खरात, संचालक पी. बी. पाटील, औदुंबर वाडदेकर, मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणु पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, रेवणसिध्द् लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर यांचेसह मारुती वाकडे, भारत पाटील, जालिंधर व्हनुटगी, एकनाथ होळकर सह सभासद- शेतकरी, तोडणी वाहतूक ठेकेदार, पदाधिकारी उपस्थित होते. सुत्रसंचालन अशोक उन्हाळे यांनी तर आभार संचालक भारत बेदरे यांनी मानले.

टॅग्स :mangalwedhaSugar Factory