
पंढरपूर : राज्यात कर्ज माफीचा वाद पेटलेला असतानाच राज्याचे क्रीडा मंत्री दत्ता भरणे यांनी राज्यातील शेतकऱ्यांना सध्या तरी कर्ज माफी देणे शक्य नसल्याचे विधान करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सुरात सूर मिसळला आहे. मंत्री भरणे यांच्या विधानानंतर शेतकऱ्यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.