

टेंभुर्णी : माढा तालुक्यातील कन्हेरगांव येथील शिक्षकाच्या बंद घराचे कुलूप चोरट्यांनी भरदिवसा तोडून कपाटातील सुमारे साडे आठ लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले. गुरूवारी दुपारी एक ते दोन वाजून वीस मिनिटे या दरम्यान ही चोरीची घटना घडली. टेंभुर्णी पोलीस ठाण्यात अनिता विजय माने ( वय 43 रा. कन्हेरगांव ता.माढा ) यांनी चोरट्यांविरोधात फिर्याद दाखल केली आहे.