Ashti Burglary : आष्टी येथे दिवसा साडेतीन लाखांची चोरी; मोहोळ पोलिसात फिर्याद दाखल
प्रसादने गजाने खोलीचे कुलूप तोडून आत प्रवेश केला असता, कपाटाचे लॉकर तोडून लॉकरमध्ये ठेवलेली साडेतीन लाखांची रक्कम गायब असल्याचे त्यांना दिसून आले. त्यावेळी आपली चोरी झाल्याचे त्यांची खात्री झाली.
मोहोळ : बंद घराचा दरवाजा उघडून आतील कपाटातील साडेतीन लाख रुपये रोख चोरून नेण्याची घटना शनिवारी रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास आष्टी (ता. मोहोळ) येथे घडली. दिवसा ढवळ्या झालेल्या या चोरीने परिसरात घबराट पसरली आहे.