विठ्ठल मंदिरात मनमोहक सजावट

vittal
vittal
Updated on

पंढरपूर (सोलापूर) : माघी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त आज आकर्षक रंगीबेरंगी फुलांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सजावट करण्यात आली. मनमोहक सजावट, पांढराशुभ्र पोशाख डोक्यावर पगडी यामुळे राजस सुकुमार अर्थात सावळ्या विठुरायाचे रूप अधिकच खुलून दिसू लागले. यात्रेच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सुमारे तीन लाखाहून अधिक भाविक पंढरीत आले आहेत.
जरबेरा, अष्टर, मोगरा, झेंडू अशा विविध रंगीबेरंगी फुलांनी श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिरात पुण्याच्या मोरया प्रतिष्ठानच्या वतीने ही आकर्षक सजावट करण्यात आली आहे. माघी एकादशीच्या निमित्ताने श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल कथा सुनील जोशी यांच्या हस्ते सपत्नीक श्री विठ्ठलाची पूजा करण्यात आली. श्री रुक्मिणी मातेची पुजा लेखापरीक्षक सुरेश कदम यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली. विठुरायाला पांढराशुभ्र पोशाख आणि आकर्षक पगडी घालण्यात आली असून रुक्मिणी मातेला देखील आकर्षक पोषाख करण्यात आला आहे. श्री विठ्ठलाच्या दर्शनाची रांग सर्व सहा पत्राशेड भरून गोपाळपूर रस्त्यावर गेली आहे.
माघ एकादशीच्या निमित्ताने चंद्रभागेत स्नान करण्यासाठी लाखो भाविकांनी पहाटेपासून चंद्रभागेच्या तीरावर गर्दी केली होती. नदीमध्ये पुरेसे पाणी असल्यामुळे भाविकांच्या स्नानाची चांगली सोय झाली आहे. उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सागर कवडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर हे यात्रेकरूंची गैरसोय होऊ नये यासाठी सर्वत्र फिरून लक्ष ठेवत आहेत.
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर प्रदक्षिणामार्ग आणि चंद्रभागेचा वाळवंट हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला आहे. श्रीविठ्ठल मंदिरात मोबाईल नेण्यास बंदी करण्यात आल्यानंतरची ही पहिलीच यात्रा आहे. अनेक भाविकांना याची कल्पना नसल्यामुळे रांगेत उभारलेल्या भाविकांना मोबाईल लॉकरमध्ये ठेवण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Emergency Rural Safety System Suspended in Solapur Over Lack of Funds
 Inspector of Police
MLA Dr. Babasaheb Deshmukh
Congress spokesperson Hanumant Pawar criticizes BJP over Ram Mandir credit politics and 'Ladki Bahin' scheme policy
Marathi News Esakal
www.esakal.com