
सोलापूर : ग्राहकसेवेच्या कृती मानकांनुसार निश्चित केलेल्या कालावधीत मागेल त्यांना नवीन वीजजोडणी त्वरित द्यावी. सोबतच महावितरण व वीजग्राहकांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आणि अचूक बिलिंगसाठी नादुरुस्त व सदोष वीजमीटर तातडीने बदलावेत, असे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिले आहेत.