esakal | कोरोना : जामखेड- करमाळा रस्त्यावर नाकेबंदी करण्याची मागणी 
sakal

बोलून बातमी शोधा

Demand for blockade on Jamkhed Karmala road

करमाळा- जामखेड रस्त्यावर आळजापुर हे करमाळा तालुका व सोलापूर जिल्ह्यातील शेवटचे गाव आहे. या ठिकाणी सीना नदीवर पुल असुन येथुन पुढे जामखेड तालुका म्हणजेच अहमदनगर जिल्हा सुरू होते. दोन दिवसापुर्वी जामखेड येथे कोरोनाचे रूग्ण सापडले आहेत. करमाळा ते जामखेड या दोन्ही तालुक्‍यातील गावांची ये- जा जास्त प्रमाणावर सुरू असते. त्यामुळे करमाळा तालुक्‍यातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

कोरोना : जामखेड- करमाळा रस्त्यावर नाकेबंदी करण्याची मागणी 

sakal_logo
By
अण्णा काळे

करमाळा (सोलापूर) : जामखेड (जि. अहमदनगर) येथे कोरोनाचे पाच रूग्ण सापडल्याने करमाळा तालुक्‍यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. करमाळ्यापासुन जामखेड हे 35 किलोमीटरवर आहे. त्यामुळे जामखेडकडुन येणाऱ्या मुख्य रस्त्यावर आळजापुर (ता. करमाळा) येथे नाका बंदी करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. 
करमाळा- जामखेड रस्त्यावर आळजापुर हे करमाळा तालुका व सोलापूर जिल्ह्यातील शेवटचे गाव आहे. या ठिकाणी सीना नदीवर पुल असुन येथुन पुढे जामखेड तालुका म्हणजेच अहमदनगर जिल्हा सुरू होते. दोन दिवसापुर्वी जामखेड येथे कोरोनाचे रूग्ण सापडले आहेत. करमाळा ते जामखेड या दोन्ही तालुक्‍यातील गावांची ये- जा जास्त प्रमाणावर सुरू असते. त्यामुळे करमाळा तालुक्‍यातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

रस्ता बंद करावा 
जामखेड येथे कोरोनाचे रूग्ण सापडल्याने आमच्याकडे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे करमाळा- जामखेड रस्ता बंद करण्याची मागणी आम्ही केली आहे. हा रस्ता बंद केला तर जामखेड भागातील लोक येथे येणार नाहीत. त्यामुळे कोरोनाचा धोका कमी होऊ शकतो. 
- युवराज गपाट, आळजापुर, ता. करमाळा 

गावकऱ्यांनी या कामी स्वतः हून हिरीरीने भाग घ्यावा​ 
जामखेड तालुक्‍यात व अहमदनगरमध्ये कोरोना व्हायरसची लागण झालेले रुग्ण आहेत. त्या बाजूकडून करमाळ्याकडे येणारे जे रोड आहेत. तेथून काही लोक करमाळा तालुक्‍यात प्रवेश करत आहेत, अशी खात्रीलायक माहिती आहे. त्या भागाचे सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच पोलिस पाटील व सर्व गावकरी यांनी याबाबीकडे गांभीर्याने पाहून पोलिस पाटील व पोलिसांनी गावकऱ्यांची मदत घेऊन येणारे रस्ते, उपरस्ते, पायवाटा सील कराव्यात. गावकऱ्यांनी या कामी स्वतः हून हिरीरीने भाग घ्यावा व आपल्या करमाळा तालुक्‍याला लागण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. कोणीही व्यक्ती चोरून- लपून कोठूनही आला तरी त्याला प्रवेश देऊ नये, असे आवाहन करमाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांनी केले आहे. 

loading image