esakal | कुकडीचे पाणी मांगी तलावात सोडवण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आग्रही
sakal

बोलून बातमी शोधा

Demand for release of Kukdi water in Mangi lake in Karmala taluka

करमाळा तालुक्यातील मांगी तलाव पुर्णपणे कोरडा आहे. या भागातील लोकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. त्यामुळे कुकडीच्या सुरु असलेल्या अवर्तनात मांगी तलावात पाणी सोडावे, अशी मागणी जलसंपदामंञी जयंत पाटील यांच्याकडे केली असल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी दिली आहे.

कुकडीचे पाणी मांगी तलावात सोडवण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आग्रही

sakal_logo
By
अण्णा काळे

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील मांगी तलाव पुर्णपणे कोरडा आहे. या भागातील लोकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. त्यामुळे कुकडीच्या सुरु असलेल्या अवर्तनात मांगी तलावात पाणी सोडावे, अशी मागणी जलसंपदामंञी जयंत पाटील यांच्याकडे केली असल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी दिली आहे.
कुकडीच्या अवर्तनासंदर्भात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती. या कॉन्फरंसमध्ये मंत्री बबनराव पाचपुते, मंञी दिलीप वळसे- पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, करमाळ्याचे आमदार संजय शिंदे, कर्जतचे आमदार रोहित पवार, निलेश लंके, सचिव लाभक्षेत्र विकास मंत्रालय राजेंद्र पवार, कार्यकारी संचालक महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ खलील अन्सारी, मुख्य अभियंता विलास राजपूत, अधिक्षक अभियंता हेमंत धुमाळ सहभागी झाले होते. 
माहिती देताना खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर म्हणाले, करमाळा तालुक्यातील मांगी तलावात पाणी सोडण्यासाठी आपण आग्रही आहोत. याबाबत करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटील यांनी आपल्याकडे करमाळा तालुक्याला पुर्ण क्षमतेने कुकडीचे पाणी मिळावे व करमाळा तालुक्यासाठी असलेल्या आरक्षित पाण्यातुन मांगी तलाव भरून घ्यावा, अशी मागणी केली होती.
जलसंपदामंञी जयंत पाटील यांच्याशी काॅन्फरसद्वारे झालेल्या बैठकीत आपण मांगी तलावात कुकडीचे पाणी सोडण्याची आग्रही मागणी केली आहे. या तलावात पाणी सोडल्यास 25 गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.

loading image