वाझे प्रकरणी करा माझी चौकशी ! उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विरोधकांना खुले आव्हान !

Ajit_Pawar
Ajit_Pawar

पंढरपूर (सोलापूर) : सचिन वाझे प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर आरोप झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांचेही नाव या प्रकरणी जोडले गेले आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज वाझे प्रकरणी झालेले आरोप फेटाळून लावत, "या प्रकरणी माझी चौकशी करावी' असे खुले आव्हान विरोधकांना दिले. 

उपमुख्यमंत्री अजित पवार आज पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी पंढरपुरात आले आहेत. सकाळी त्यांच्या उपस्थितीत भाजप नेते कल्याणराव कल्याण काळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी आढीव येथील काळे यांच्या फार्महाउसवर पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी त्यांनी वाझे प्रकरणी खुलासाही केला. 

या वेळी पवार म्हणाले, वाझे या व्यक्तीला मी कधीही भेटलो नाही. माझे वाझेशी कधी संभाषण देखील झाले नाही. त्याने माझ्या नावाचा उल्लेख करण्याचं काहीच कारण नाही. माझे या प्रकरणी नाव आल्याने माझी चौकशी करावी. माझ्यावरील हा आरोप धादांत खोटा आहे. सध्या अनिल देशमुखांची सीबीआय चौकशी करण्याचे न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यात माझीही चौकशी करावी, चौकशीत दूध का दूध पानी का पानी होईल. विरोधकांकडून जाणूनबुजून महाविकास आघाडीचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. 

महाराष्ट्राला जेवढी लस मिळायला पाहिजे तेवढी लस मिळत नाही. सुरवातीच्या काळात केंद्राने परदेशात लस पाठवण्याची घाई केली, पण ठीक आहे, ती पण आपलीच भावंडं आहेत. आपल्या देशात तयार होणारी लस आपल्या लोकांना आधी मिळायला पाहिजे, ही आमची मागणी आहे. बाहेरच्या देशात लस पाठवण्याऐवजी आता देशातील राज्यांमध्ये मागणीनुसार लस द्यावी. कालच 350 कोटी लसीचं वाटप करण्यात आले. त्यामध्ये महाराष्ट्राला 7 लाख 50 हजार लसी मिळाल्या आहेत. ठरावीक दिवसात लसीकरण संपवायचे आहे. यासाठी शासकीय व वैद्यकीय यंत्रणा कामाला लावल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. 

या वेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, कल्याणराव काळे, दीपक साळुंखे, सुरेश घुले, भगीरथ भालके आदी उपस्थित होते. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com