पंढरपूर : भोसे (ता. पंढरपूर) येथील दूध भेसळप्रकरणी आरोपी दत्तात्रय जाधवसह इतर आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी आमदार अभिजित पाटील यांनी विधानसभेत केली होती. त्यांच्या मागणीनुसार दूध भेसळ करणाऱ्या आरोपींवर मोका अंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. त्यामुळे आता दूध भेसळ प्रकरणी मोका अंतर्गत कारवाईची सुरवात पंढरपुरातून होण्याची शक्यता आहे.