
सोलापूर : बागवान कुटुंबातील आई, वडील, बहीण व भाऊ या चौघांचाही प्रलंयकारी आगीत मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर कुटुंबातील विवाहित बहिणींनी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाच्या परिसरात टाहो फोडला. आएशाबीच्या मुलींच्या दुःखाने रुग्णालयातील प्रत्येकाच्या पापण्या ओलावल्या.