Devendra Fadanvis
Devendra Fadanvis Esakal

Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीसांच्या दौऱ्याला लागेना ‘मुहूर्त’,भाजपच्या सर्वांनाच भेटीची प्रचंड उत्सुकता

सोलापुरातील महसूल भवन अन्‌ इंद्रभवनला उद्‌घाटनाची प्रतिक्षा

स्मार्ट सिटी योजनेसह विविध योजनेंतर्गत करण्यात आलेल्या विकास कामांच्या उद्‌घाटनासाठी गेल्या वर्षभरापासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोलापूर दौऱ्याचे नियोजन करण्यात आले. मात्र विविध कारणास्तव आतापर्यंत सोलापूरचा त्यांचा नियोजित दौरा चारवेळा रद्द झाला. कर्नाटक निकालानंतर पक्षीय स्तरावर आयोजित केलेल्या बैठकीमुळे मंगळवार (ता.१६) दौराही रद्द झाला. आता गुरुवार (ता.१८) नंतरच दौऱ्याची रूपरेषा स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, कामगार कल्याण मंत्री सुरेश ख्याडे हे उद्या बुधवारी (ता.१७) सोलापुरात असून जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांशी ते संवाद साधणार आहेत. येथील महसूल भवन अन्‌ इंद्रभवनला उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटनाची प्रतिक्षा आहे. निवडणुकांच्या तोंडावर भाजपच्या सर्वांनाच भेटीचे प्रचंड औत्सुक्य राहात आहे.

Devendra Fadanvis
CJI Chandrachud: न्यायमूर्ती शाहांच्या निरोप समारंभात CJI चंद्रचूड यांचा शायराना अंदाज; म्हणाले 'आंख से दूर...'

महापालिकेचे इंद्रभवन इमारत, शहरातील शंभर बेडचे हॉस्पिटल, महसूल भवन आदी विकास कामांच्या उद्‌घाटनांसह शहर व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची बैठक. मिशन २०२४ साठी बूथ सक्षमीकरणासाठीची तयारी. शहराच्या विकासासाठी महत्त्वाची असलेली कामे, त्यासाठी आवश्यक असलेल्या निधीची उपलब्धता. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठका अशी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यासंदर्भातील नियोजनाची मोठी यादी भाजप आणि प्रशासकीय स्तरावर करण्यात आली होती.

Devendra Fadanvis
Ajit Pawar: '१६ आमदार अपात्र ठरणार नाहीत', पवारांच्या वक्तव्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले, 'निर्णय विधानसभा...'

मात्र कर्नाटक निवडणुकीच्या निकालाचा परिणाम दौऱ्यावर झाला असे मानण्यात येत आहे. कर्नाटक राज्यामधील पराभवाच्या पार्श्वभूमीवर, प्रदेशस्तरावर घेण्यात येणाऱ्या बैठका, पुण्यातील सलग तीन दिवस आयोजित कार्यकारिणी बैठक आदींमुळे सोलापूरचा दौरा रद्द करण्याची नामुष्की पक्षावर ओढवली.

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत पाच कोटी रुपये खर्चून देखणी बनविण्यात आलेली इंद्रभवन ही ऐतिहासिक वास्तू उद्‌घाटनाविना गेल्या तीन महिन्यांपासून धूळखात पडून आहे. तर महसूल भवनाची इमारत उद्घाटनाशिवाय धूळखात पडून आहे. फडवणवीसांच्या दौऱ्याच्या निमित्ताने, या वास्तुंवरील धूळ झटकली गेली. मात्र उद्घाटनाची प्रतिक्षा कायम राहिली.

Devendra Fadanvis
Weather Update : मोचा चक्रीवादळाचा परिणाम! राज्यात उष्णतेची लाट येणार, हवामान विभागाकडून अलर्ट

फडणवीस हे विरोधी पक्षनेते पदावर विराजमान झाल्यापासून ते आजतागायत सोलापुरातील पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्या सभेची, बैठकीची तयारी करीत आहेत. पक्षांतर्गत निर्माण झालेल्या तक्रारींचा पाढा वाचण्यासाठी काही माजी सदस्य उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्याची चातकासारखी वाट पाहत आहे.

तर काही सदस्य महापालिकेचे तिकीट पदरी पाडण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने उपमुख्यमंत्री फडणवीसांवर प्रभाव पाडण्यासाठी जय्यत तयारीत आहेत. त्याशिवाय प्रशासनातील अधिकारीही सोलापूर शहरातील रखडलेली कामे, निधीची आवश्यकता, नवे प्रस्ताव आदी शहर विकासासंदर्भातील विषयांच्या फायली सज्ज करुन फडणीस यांच्या बैठकीची वाट पाहत आहेत.

Devendra Fadanvis
Karnataka CM : सिद्धरामय्या की DK? मुख्यमंत्रीपदाचा तिढा आज सुटणार, हायकमांडच्या घोषणेकडं लक्ष्य

मंगळवार (ता. १६) मे रोजीचा दौरा रद्द झाल्याने या सर्व प्रक्रिया आता लांबणीवर पडल्या आहेत. आतापर्यंत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नियोजित चार दौरे रद्द झाले असून सोलापुरच्या दौऱ्याला काय ‘मुहूर्त’ लागेना हे वास्तव आहे.

कर्नाटक निकालाचा या दौऱ्याशी काही संबंध नाही. अखिल भारतीय अध्यक्ष हे तीन दिवस आहेत. त्यांच्या उपस्थितीत पुण्यात दोन दिवस प्रदेश कार्यकारिणीच्या बैठका आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा दौरा पुढे ढकलण्यात आला आहे. या बैठका १७ पर्यंत पूर्ण होतील. १८ मेनंतर त्यांच्या दौऱ्याबाबतची रूपरेषा स्पष्ट होईल. तत्पूर्वी १७ मे रोजी कामगार कल्याण मंत्री हे सोलापूर दौऱ्यावर आहेत.

- विक्रम देशमुख, भाजप शहराध्यक्ष, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com