
सोलापूर : सोलापुरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, टेक्स्टाईल पार्क व्हावे, गोरक्षकांवर दाखल खोटे गुन्हे, गणेश मूर्तिकारांच्या समस्या असे विषय आमदार देवेंद्र कोठे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित केले. राज्यपालांच्या अभिभाषणानंतर आमदार कोठेंनी बुधवारी रात्री ११ च्या सुमारास सोलापूर शहराच्या विविध प्रश्नांकडे सभागृहाचे आणि शासनाचे लक्ष वेधले.