
सांगोला : पंढरपूर येथील श्री विठ्ठल दर्शनाला निघालेल्या खैरवाड (ता. खानापूर, जि. बेळगाव) येथून जीपच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात गाडीतील १२ प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी (ता. १८) रत्नागिरी-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाचेगाव (ता. सांगोला) हद्दीत घडला.