पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला पुण्याच्या भक्ताने केली फुलांची सजावट ! चौदा वर्षांपासून अखंडित विठ्ठलसेवा ! 

Pandharpur
Pandharpur
Updated on

सोलापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या नऊ महिन्यांपासून देशातील सर्वच धार्मिक स्थळे भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आली होती. पंढरपुरातील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिरही बंद राहिल्याने अनेक भक्त दर्शनासाठी आतुर झाले होते. अशीच आस पुणे येथील एका भक्ताला लागली होती. त्यांनी देवाकडे प्रार्थना केली, की "देवा, तुझे भक्त तुझ्या दर्शनासाठी आतुर झाले आहेत. तेव्हा तुझे द्वार भक्तांसाठी उघड !' दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल मंदिर दर्शनासाठी खुले झाले अन्‌ या भक्‍ताने श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट करून सेवा अर्पण केली. 

पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिर पाडव्याला (सोमवारी) दर्शनासाठी खुले झाले. यानिमित्त भोसरी (पुणे) येथील विठ्ठलभक्त दिलीप भुजबळ यांनी बुधवारी (ता. 18) श्री विठ्ठल व रुक्‍मिणीचा गाभारा, सोळखांबी, नामदेव पायरी आकर्षक फुलांनी सजवली. नामदेव पायरीला दिव्यांच्या पणत्या, विठ्ठल-रुक्‍मिणी गाभाऱ्यात फुलांच्या पायघड्या घालून दीपोत्सव साजरा केला. सर्वत्र आनंदी वातावरण निर्माण केले. 

श्री. भुजबळ यांनी या सजावटीला मंगळवारी (ता. 17) सायंकाळी सात वाजता सुरवात केली, ती बुधवारी (ता. 18) सायंकाळी सात वाजेपर्यंत संपली. यासाठी 25 कारागिरांनी सेवा अर्पण केली. फुलांच्या सजावटीसाठी दोन टन फुलांचा वापर करण्यात आला. यात अँथोरियम, ऑर्केड, गुलाब, शेवंती, आष्टर, निशिगंध, झेंडू, अशोकाची पाने आदींचा वापर करण्यात आला. या सजावटीत पुणे येथील ज्यूस सेंटरचालक रामभाऊ मोहरे यांनीही पाच प्रकारची फळे यात संत्री, मोसंबी, सफरचंद, अननस, खरबूज या फळांचा वापर करून आकर्षक सजावट केली. 

भुजबळ करताहेत अखंडित सेवा अर्पण 
दर आषाढी एकादशी, विठ्ठल-रुक्‍मिणी विवाह सोहळा (वसंत पंचमी) अशी वर्षातून दोने वेळा दिलीप भुजबळ हे श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिरात फुलांची सजावट करतात. विठ्ठल-रुक्‍मिणी विवाह सोहळ्यातील सेवेला जानेवारी 2020 मधील वसंत पंचमीला 14 वर्षे पूर्ण झाली आहेत, तर आषाढी एकादशीच्या सेवेला तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. यापुढेही ही सेवा त्यांच्या कुटुंबीयांकडून सुरूच राहणार असल्याची ग्वाही त्यांनी "सकाळ'शी बोलताना दिली. 

लहानपणापासूनच लागली विठ्ठलाची ओढ 
आता आमची चौथी पिढी फुलांच्या व्यवसायात आहे. वडील दिलीप भुजबळ यांच्याबरोबर लहानपणी पंढरपूरला जात असे. खूप आनंद वाटायचा. तेथील वातावरण व विठ्ठल मंदिर पाहून भारावून जायचो. तेव्हा विठ्ठलाची सेवा करण्याची संधी मिळावी, असे वाटत होते. सेवा करण्याचा मान 14 वर्षांपासून मिळत आहे. घरच्यांचं, मित्रपरिवार व मंदिर समितीचं पूर्णपणे सहकार्य मिळते. कुठलाही त्रास न होता आनंदाने ही सेवा करत आहे. पुढेही सेवा अखंडित चालू राहणार आहे. 
- दिलीप भुजबळ, भोसरी (पुणे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Praniti Shinde serves devotees at Machnur Siddheshwar Temple
Uttamprakash Khandare’s Stand on SC Quota
Solapur Weather Update
MSEDCL Load Shedding Hits Penur Farmers Ujani Canal Full But Power Shortage Causes Sugarcane And Other Crops To Dry
Marathi News Esakal
www.esakal.com